Indian Post News : टपाल विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना

एमपीसी न्यूज – विद्यार्थ्यांची (Indian Post News)  फिलाटेली (टपाल तिकीट संकलन) आवड वृद्धिंगत व्हावी यासाठी टपाल विभागाने दीनदयाळ स्पर्श योजना हा शिष्यवृत्ती कार्यक्रम सुरू केला आहे. इयत्ता सहावी ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांमध्ये छंद म्हणून फिलाटेलीला प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. ही शिष्यवृत्ती मंडळ कार्यालयांद्वारे आयोजित फिलाटेली क्विझ आणि फिलाटेली प्रकल्पावर आधारित आहे.

विद्यार्थ्यांनी मान्यताप्राप्त शाळेत (इयत्ता सहावी ते नववी) प्रवेश घेणे आवश्यक आहे. शाळेत फिलाटेली क्लब असावा आणि विद्यार्थी क्लबचा सदस्य असावा. जर शाळेत फिलाटेली क्लब नसेल तर स्वतःचे फिलाटेली डिपॉझिट खाते असलेले विद्यार्थी देखील अर्ज करू शकतात. विद्यार्थ्यांनी नुकत्याच झालेल्या अंतिम परीक्षेत किमान 60 टक्के गुण मिळवले असावे (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना 5 टक्के सूट).

Pune : टायर फुटल्याने कार खडकवासला धरणात पडली; चौघे बचावले, मुलीचा मृत्यू

निवड प्रक्रिया दोन पातळीवर आहे : स्तर 1 – फिलाटेली लिखित प्रश्नमंजुषा आणि स्तर 2 – फिलाटेली प्रकल्प. पहिल्या पातळीवर चालू घडामोडी, इतिहास, विज्ञान, क्रीडा, संस्कृती, भूगोल आणि फिलाटेली (स्थानिक आणि राष्ट्रीय) या विषयांचा समावेश असलेल्या 50 प्रश्नांसह बहुपर्यायी प्रश्नमंजुषा समाविष्ट आहे. प्रादेशिक स्तरावरील लेखी प्रश्नमंजुषेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पुढच्या फेरीत जातील. पुढील फेरीतील विद्यार्थ्यांना अंतिम निवडीसाठी फिलाटेली प्रोजेक्ट सादर करणे आवश्यक आहे. हा प्रकल्प 4 ते 5 पानांचा असावा, त्यात 16 स्टॅम्प आणि 500 शब्दांपेक्षा जास्त नसावे.

यासाठीचे अर्ज 8 सप्टेंबर पर्यंत स्वीकारले जातील. इच्छुक विद्यार्थ्यांनी आपले अर्ज ‘वरिष्ठ टपाल अधीक्षक” टपाल कार्यालय, गोवा विभाग, पहिला मजला, टपाल भवन, पणजी-गोवा-403001’ या पत्त्यावर पाठवावे, असे आवाहन टपाल विभागाने केले (Indian Post News) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.