Pune : ’पूना गेस्ट हाऊस’ ला मिळाला टपाल तिकीटाचा मान

एमपीसी न्यूज – पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावरील ‘पूना गेस्ट हाऊस’ला आता टपाल (Pune)तिकिटावर झळकण्याचा बहुमान मिळाला आहे. असा बहुमान प्रथमच आदरातिथ्य क्षेत्रातील संस्थेला मिळाला आहे.

टपाल विभागातर्फे बालगंधर्व कलादालनात भरविण्यात (Pune)आलेल्या पुणेपेक्स प्रदर्शनामध्ये पूना गेस्ट हाऊसचे छायाचित्र असलेल्या टपाल पाकिटाचे अनावरण गुरुवारी (दि.7) करण्यात आले.

Mumbai : अभिनेते ज्युनिअर महमूद यांचं निधन

पूना गेस्ट हाऊसचे संचालक किशोर सरपोतदार, अभय सरपोतदार, साधना सरपोतदार आणि शर्मिला सरपोतदार उपस्थित होत्या. मूकपटाचे निर्माते नानासाहेब सरपोतदार यांनी 1935 मध्ये स्थापन केलेल्या पूना गेस्ट हाऊसच्या माध्यमातून सरपोतदार कुटुंबाची चौथी पिढी कार्यरत आहे.टपाल विभागाच्या उपक्रमाचे कृतज्ञतापूर्वक कौतुक केले गेले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.