PCMC : शहरात 1351 कुणबी नोंदी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेने 1 लाख 34 हजार 602 नोंदी (PCMC)तपासल्या असून एक हजार 351 मराठा-कुणबी जातीच्या नोंदी आढळून आल्या आहेत.

राज्य शासनाच्या आदेशानुसार महापालिकेतील सन 1948 ते 1967 या आणि सन 1948 पूर्वीच्या कालावधीतील दस्तऐवज व कागदपत्रांतील नोंदणी तपासण्यात आल्या.

शिक्षण, कर आकारणी व कर संकलन, (PCMC)वैद्यकीय व लेखा विभागांतील या कालावधीतील उपलब्ध दस्तऐवज, कागदपत्र व नोंदी तपासल्या आहेत. शिक्षण विभागातील सर्वांधिक 1 लाख 20 हजार 387 नोंदी तपासल्या. 1948 ते 1967 या कालावधीतील 77 हजार 726 नोंदीची तपासणी केल्यानंतर 198 मराठा-कुणबी जातीच्या नोंदी आढळून आल्या.

Alandi : आळंदी ग्रामस्थांच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास मी त्याबद्दल समस्त आळंदीकरांची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो-योगेश देसाई

तर, 1948 पूर्वीच्या कालावधीतील शिक्षण विभागातील 42 हजार 661 नोंदी तपासल्या त्यापैकी एक हजार 153 कुणबी नोंदी आढळल्या. महापालिकेने एकूण 1 लाख 34 हजार 602 नोंदी तपासल्या असून एक हजार 351 कुणबी जातीच्या नोंदी आढळून आल्या आहेत. याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर केला आहे.या कुणबी नोंदी महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. ऑनलाइन नोंद दिसल्यानंतर नक्कल मिळण्यासाठी महापालिकेकडे लेखी अर्ज करावा लागणार आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.