Pune : पुणेकरांनो, हॉर्न नॉट ओके प्लीज…’नो हॉर्न डे’च्या निमित्ताने पुण्यात जनजागृती

एमपीसी न्यूज : एक, दोन, तीन, चार नो हॉर्न बार बार…ऐका हो ऐका हॉर्न वाजवू नका… नका वाजवू जोरात हॉर्न… आपली (Pune) तब्येत राहिल छान, हॉर्न नॉट ओके प्लीज… अशा घोषणा देत पुणेकरांनी ‘नो हॉंकिंग डे’ अर्थात ‘नो हॉर्न डे’च्या निमित्ताने बालगंधर्व रंगमंदिर चौकात जनजागृती केली. ज्येष्ठांसोबतच महाविद्यालयीन तरुण आणि पुणे वाहतूक पोलिसांनी यामध्ये सहभाग घेत पुणेकरांनो हॉर्न वाजवू नका, असे सांगण्यासोबतच वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहनही केले.

लाईफ सेव्हिंग फाऊंडेशन, पुणे पोलीस (वाहतूक शाखा) आणि नवचैतन्य हास्ययोग परिवार यांच्या वतीने नो हाँकीग डे अर्थात पुण्यात हॉर्न ठेवा एक दिवस बंद अशी संकल्पना राबवित जनजागृती करण्यात आली. पुण्यातील विविध ठिकाणी नो हाँकींग डे उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व रंगमंदिर चौक येथे मुख्य जनजागृतीपर कार्यक्रम झाला.

Pune : कसबा मतदासंघांत अल्पदरात कांदा, हरभरा डाळ वाटप

यावेळी पुणे वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त जगदीश सातव, मॉडर्न महाविद्यालयाचे प्रा.राजेंद्र झुंजारराव, नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे विठ्ठल काटे, एकपात्री कलाकार मकरंद टिल्लू, लायन्स क्लब पुणे लोटसचे अध्यक्ष प्रसन्न पाटील, लाईफ सेव्हिंग फाऊंडेशनचे देवेंद्र पाठक, प्रा.पद्माकर पुंडे, संग्राम खोपडे आदी मान्यवर उपस्थित होते.

मॉडर्न कॉलेजमधील एनएसएसचे विद्यार्थी देखील जनजागृतीमध्ये सहभागी झाले होते. त्यानंतर प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न कॉलेज आॅफ आर्टस्, कॉमर्स, सायन्स कॉलेजमध्ये मुख्य कार्यक्रम पार पडला. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. उपक्रमाचे यंदा पाचवे वर्ष आहे.

मकरंद टिल्लू म्हणाले, वाढत्या ध्वनी प्रदूषणामुळे पुणेकरांना उच्च रक्तदाब, हदयरोग, मानसिक ताण, चिडचिडेपणा, नैराश्य आणि बहिरेपणा या त्रासांचा देखील सामना करावा लागत आहे. हे टाळण्यासाठी नो हॉर्न ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविणे गरजेचे आहे. वाहतुकीचे नियम पाळून आपल्या कृतीने इतरांची वृत्ती बदलण्याचा आपण प्रयत्न करुया.

देवेंद्र पाठक म्हणाले, पुण्यात 90 टक्के वेळा जे हॉर्न वाजविले जातात, हे अनावश्यक असतात. बहुतांशी पुणेकर हे दिवसाला दीड ते दोन तास ट्रॅफिकमध्ये असतात आणि (Pune) या अनावश्यक हॉर्नमुळे त्यांना ब-याचश्या दुष्परिणामांना सामारे जावे लागते, त्यामुळे नो हॉर्न या संकल्पनेला प्रोत्साहन देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. मी स्वत: गेले अनेक महिने हॉर्न न वाजविता वाहन चालवित आहे. हॉर्न न वाजविता वाहन चालविणे शक्य असून तसा प्रयत्न आपण करायला हवा, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.पद्माकर पुंडे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.