Pune : कसबा मतदासंघांत अल्पदरात कांदा, हरभरा डाळ वाटप

एमपीसी न्यूज – कसबा मतदारसंघातील प्रभाग क्र. 17 येथे आज कांदा वाटप करण्यात (Pune) आले. केंद्र सरकार नाफेडच्या वतीने 25 रुपयाने प्रति व्यक्ती 2 किलो कांदा नागरिकांना देण्यात आला. बाजारभाव पेक्षा कमी दराने कांदा आपल्या दाराजवळ मिळत असल्याने नागरिकांनी आभार मानत आनंद व्यक्त केला.

Chakan : कट का मारला म्हणून वकिलाला मारहाण, दोघांना अटक

त्याचप्रमाणे हरभरा डाळ ही साठ रुपये किलोने विक्री करण्यात आली. यावेळी भाजपा कसबा (Pune) मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख हेमंत रासने, कसबा मतदारसंघाचे अध्यक्ष राजेंद्र काकडे, संजय मामा देशमुख , सरचिटणीस उमेश चव्हाण, अमित कंक, राजू परदेशी, प्रभाग अध्यक्ष सनी पवार, माधव साळुंके, अमित शेट्टी, सचिन सोळंकी, प्रथमेश पाठक, जितेंद्र दळवी, गणेश पाचरेकर, कुणाल गरुड, करण देसाई, शैलजा पाठक इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते, अशी माहिती प्रचार प्रसिद्धी प्रमुख बाप्पू नाईक यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.