Chakan : कट का मारला म्हणून वकिलाला मारहाण, दोघांना अटक

एमपीसी न्यूज – आम्हाला कट मारला म्हणून टोळक्यांनी एका(Chakan) वकिलाला मारहाण केली आहे. याप्रकरणी चाकण पोलिसांनी दोघांना अटक केली आहे, ही घटना रविवारी (दि.10) चाकण येथील तळेगाव चौक येथे घडली आहे.

याप्रकऱणी चाकण पोलिसांनी सोनाजी लाला मिरपगार (वय 30 रा.चाकण) व दिपक गणेश वैराग (वय 22 रा.चाकण) असे अटक आरोपीचे नाव आहे. तसेच आरोपीच्या इतर सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.चाकण पोलीस ठाण्यात उजमा अब्दुल रहिमान पठाण (वय 30 रा,जुन्नर) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

RTE : पालकांनो कागदपत्रांची जमवाजमव करा; आरटीई प्रवेश प्रक्रियेला लवकरच सुरुवात होणार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी(Chakan) हे त्यांच्या गाडीमधून जातअशताना आरोपींनी त्यांना चाकण येथील तळेगाव चौकात आडवले व त्यांनी फिर्यादीला आम्हाला कट का मारला म्हणून वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी फिर्यादीचा चालक सद्दाम शेख याला मारहाण करत फिर्यादीच्या गळ्यातील 30 हजाररुपयाची चैन हिसकावून नेली. यावरून पोलिसांनी दोघांना अटक केली असून पोलीस इतर आरोपींचा शोध घेत आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.