RTE : पालकांनो कागदपत्रांची जमवाजमव करा; आरटीई प्रवेश प्रक्रियेला लवकरच सुरुवात होणार

एमपीसी न्यूज – बालकांच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार (RTE) खासगी शाळांमध्ये 25 टक्के आरक्षित प्रवेश दिले जातात. याबाबतची ऑनलाईन प्रक्रिया राबविण्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाने सुरुवात केली आहे.

त्यामुळे पालकांना देखील आपल्या पाल्याच्या आरटीई प्रवेशासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जमवाजमव करण्यास सुरुवात करावी लागणार आहे.

Pimpri : बहिणाबाई चौधरी प्राणीसंग्रहालयातील 36 प्राण्यांच्या मृत्यूची चौकशी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश

वंचित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (RTE)विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या विना अनुदानित शाळांमध्ये 25 टक्के जागांवर शिक्षणाचा हक्क (आरटीई) कायद्यानुसार प्रवेश दिला जातो. प्रत्येक वर्षी आरटीई अंतर्गत प्रवेश घेण्यासाठी शासनाच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून ऑनलाईन प्रक्रिया राबवली जाते.

शाळांमध्ये प्रवेशासाठी उपलब्ध जागांच्या तुलनेत दरवर्षी अनेक पटींनी अर्ज दाखल होतात. त्यानंतर प्राप्त अर्जांमधून लॉटरी काढून विद्यार्थ्यांना शाळांमध्ये प्रवेश दिला जातो. आरटीई प्रवेशासाठी शाळांची नोंदणी, ऑनलाईन यंत्रणेची तपासणी, पालकांना आवश्यक कागदपत्रे काढण्याचे आवाहन आदींची तयारी प्राथमिक शिक्षण विभागाकडून केली जात आहे.

आरटीई प्रवेश प्रक्रिया मागील वर्षी प्रमाणे राबवायची की त्यात काही बदल करायचे, याबाबतचा निर्णय हिवाळी अधिवेशन झाल्यानंतर घेतला जाणार आहे. मात्र ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याची मागणी पालकांमधून केली जात आहे. अनेकदा आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेस शिक्षण विभागाकडून विलंब होतो. त्यामुळे आरटीई अंतर्गत प्रवेश घेणारे विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत अभ्यासात मागे पडतात, असे पालकांचे म्हणणे आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.