Dhankawadi : पत्नीला भेटणे पतीला पडले महागात, सासरवाडीच्यांनी दिला चोप

एमपीसी न्यूज – पत्नीला भेटण्यासाठी सासुरवाडीत जाणे एका (Dhankawadi)जावयाला महागात पडले. सासरकडील मंडळींनी कौटुंबिक वादातून जावयाला चोप दिला. या प्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजेश तुळसीराम उणेचा (वय 34, रा. कुलभुषण सोसायटी, बिबवेवाडी-कोंढवा रस्ता ) असे जखमी झालेल्या जावयाचे नाव आहे. उणेचा यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. उणेचा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सासू हेमलता मूलचंद डांगी (वय 50), सासरे मूलचंद पुखराज डांगी (वय 55), मेहुणा प्रथमेश मूलचंद डांगी आणि पूजा मुलचंद डांगी (सर्व रा. मयुर कॉम्प्लेक्स, धनकवडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sunil Ambekar : कलम 370 रद्द केल्यामुळे जम्मू-काश्मीरच्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे – सुनील आंबेकर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उणेचा यांचा माहेरकडील मंडळीशी वाद झाला होता. वादामुळे त्यांची पत्नी धनकवाडीत माहेरी आली होती. पत्नीला भेटण्यासाठी उणेचा आल्यानंतर त्यांच्यात पुन्हा वाद झाला. उणेचा यांना सासरकडील मंडळींनी बेदम मारहाण केली.

 

मारहाणीत उणेचा यांच्या डोक्याला दुखापत झाली. सहकारनगर पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.