Sunil Ambekar : कलम 370 रद्द केल्यामुळे जम्मू-काश्मीरच्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे – सुनील आंबेकर

एमपीसी न्यूज – कलम 370 रद्द केल्यामुळे जम्मू-काश्मिरच्या (Sunil Ambekar)नागरिकांना आता दिलासा मिळाला असून त्यांना आता अन्याय सहन करावा लागणार आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी व्यक्त केले आहे.

जम्मू-काश्मीरमधून कलम 370 रद्द करण्याच्या कायदेशीरतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालय महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. 5 ऑगस्ट 2019 रोजी संसदेनं जम्मू आणि काश्मीरमधून कलम 370 रद्द केला आणि राज्याचे जम्मू आणि काश्मीर आणि लडाख असे दोन भाग केले आणि दोन्ही केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित केलं.

 

Pimpri : जनता भाजपचा हिशाेब चुकता करेल -सचिन अहिर

याविरोधात सर्वोच्च न्यायालयात 23 अर्ज दाखल (Sunil Ambekar)करण्यात आले होते, त्या सर्वांची सुनावणी घेतल्यानंतर कोर्टानं सप्टेंबरमध्ये निर्णय राखून ठेवला होता आणि आज निर्णय देण्यात आला आहे. म्हणजेच, 370 रद्द केल्यानंतर 4 वर्ष, 4 महिने, 6 दिवसांनी आज सर्वोच्च न्यायालय निर्णय दिला. आज सर्वोच्च न्यायालय केंद्र सरकारचा निर्णय योग्य असल्याचा निर्वाळा सुप्रीम कोर्टाने दिला आहे.

याविषयी बोलताना सुनील आंबेकर म्हणाले की, कलम 370 रद्द करण्याला सर्वोच्च न्यायालयाने कायदेशीर मान्यता दिली हे स्वागतार्ह आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या निर्णयाचे स्वागत करतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सुरुवातीपासून कलम 370 ला विरोध करत आहे आणि संघाने या विषयावर अनेक ठरावही पारित केले आहेत आणि सर्व आंदोलनांमध्ये भाग घेतला आहे.त्यामुळे हे एक प्रकारे यशच म्हणावे लागेल.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.