Pimpri : जनता भाजपचा हिशाेब चुकता करेल -सचिन अहिर

एमपीसी न्यूज – इतर तीन राज्याच्या विधानसभा निवडणुकीत (Pimpri )काय झाले, यापेक्षा महाराष्ट्रात काय झाले, ही राज्यातील जनता उघड्या डाेळ्याने बघत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून कसे घालवले, कशा प्रकारे शिवसेना, राष्ट्रवादीत फूट पाडली, हे भाजपचे पाप जनतेने पाहिले आहे. भाजपने राजकीय दृष्टीकाेनातून नाही तर महाराष्ट्र व्देषातून हे कृत्य केले आहे.

या सर्व गाेष्टींचा हिशाेब महाराष्ट्रातील जनता आगामी निवडणुकीत घेतल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका शिवसेना पुणे जिल्हा संपर्क प्रमुख, आमदार सचिन अहिर यांनी केली.

अहिर दाेन दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवड(Pimpri) शहरात आले हाेते. त्यावेळी ते बाेलत हाेते. भाजपचे सबका साथ, सबका विकास हे घाेषवाक्य एकाच समाजापुरते कसे राहू शकते. भारताचा, राजकीय, सामाजिक, ऐतिहासिक वारसा पाहिल्यानंतर सर्व जाती-धर्मातील लाेकांना सहभागी केल्यानंतरच हे राज्य, देश महासत्ता हाेऊ शकते. संकुचित विचाराचे देशाची आर्थिक, सामाजिक प्रगती हाेणार नाही.

त्यामुळे भाजपची ही फसवी भूमिका आहे. कर्नाटकामध्ये ओबीसीबद्दल बाेलायचे, राजस्थानमध्ये राजपुत, ठाकुरांबद्दल बाेलायचे आणि जातीवाद करण्याचे सांगायचे. भाजपने दुट्पी भूमिका बंद करावी.

Talegaon Dabhade : विठ्ठल मंदिरात संजीवन समाधी सोहळा भक्तिमय वातावरणात साजरा
सिंचन खात्यात 70 हजार काेटींचा भ्रष्टाचाराचा आराेप भाजपनेच केला. एकवेळ लग्न करणार नाही, मात्र, राष्ट्रवादीबराेबर कधीच युती करणार नाही, असे सांगणारे आता अजित पवार गटाच्या नेत्यांच्या मांडीला मांडी लावून भाजपचे नेतेमंडळी बसली असल्याचा आराेप अहिर यांनी केला. आम्ही हे सर्व मुद्दे जनतेसमाेर घेऊन जात असल्याचे त्यांनी सांगितले.

भाजपमधून एकनाथ पवार यांनी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केल्याबद्दल अहिर यांना विचारले असता ते म्हणाले पवार यांचा नांदेडमध्ये पक्षाला माेठा फायदा हाेणार आहे. पवार यांनी पिंपरी-चिंचवड शहरात नगरसेवक म्हणून चांगले काम केले आहे. त्यांचा याठिकाणीही चांगला फायदा हाेणार आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.