Chikhali : चिखलीतील संतपीठातील प्रवेश प्रक्रिया सुरू; 25 डिसेंबर पर्यंत करता येणार अर्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका संचलित पाटीलनगर (Chikhali)टाळगाव चिखली येथील जगदगुरु संत तुकाराम महाराज संतपीठामध्ये शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये नर्सरी वर्गासाठी 160 विद्यार्थी, व ज्युनियर के.जी ते इयत्ता आठवीच्या वर्गासाठी रिक्त जागांची प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. त्यासाठी 25 डिसेंबर पर्यंत अर्ज करता येणार आहे.

जगदगुरू संत तुकाराम महाराज संतपीठ (Chikhali)अंतर्गत सुरू झालेले स्कूल अॅन्ड ज्युनियर कॉलेज हे महाराष्ट्र स्वयं अर्थसंहाय्यित शाळा (स्थापना व विनिमय) नियम 2012 अंतर्गत स्वयं अर्थसहाय्यित तत्वावर चालविण्यात येत आहे. जगदगुरु संत तुकाराम महाराज संतपीठ स्कूल अॅन्ड ज्युनियर कॉलेज, पाटीलनगर टाळगाव चिखली येथे शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये नर्सरी वर्गासाठी 160 विद्यार्थी, व ज्युनियर के.जी ते इयत्ता आठवीच्या वर्गासाठी रिक्त जागांच्या उपलब्धतेनुसार निश्चित येईल. ज्या वर्गाच्या क्षमतेपेक्षा प्रवेश अर्जाची मागणी जास्त असेल त्याच वर्गाचे प्रवेश अर्ज निश्चित करणेकामी सोडत पद्धत (लॉटरी) अवलंबिण्यात येईल.

Talegaon Dabhade : विठ्ठल मंदिरात संजीवन समाधी सोहळा भक्तिमय वातावरणात साजरा

केंद्रीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) नियमानुसार अभ्यासक्रम, व्यवस्थापन, कार्यपद्धती, अध्ययन व अध्यापन प्रणाली इंग्रजी माध्यमातून असेल त्यामध्ये मराठी, हिंदी व संस्कृत भाषेचा विषय म्हणून समावेश असेल. तसेच भारतीय संत साहित्य आध्यात्मिक व सांस्कृतिक अभ्यासक्रमाची जोड असेल. संतपीठ प्रवेश प्रक्रियेसाठी प्रथम चौकशी फॉर्मचे वाटप करण्यात येईल व फॉर्म जमा करण्याची अंतिम तारीख 25 डिसेंबर 2023 राहील. पात्र अर्जामधून जागांच्या उपलब्धतेनुसार सोडत पद्धतीने विद्यार्थांची निवड करण्यात येईल. तसेच आर.टी.ई च्या नियमानुसार नर्सरी वर्गासाठी आरक्षण लागू राहील.

सदर शाळेमध्ये प्रवेश निश्चित विद्यार्थांसाठी पूर्व प्राथमिक वर्गांसाठी प्रती विद्यार्थी 23 हजार रुपये शैक्षणिक शुल्क ठरविण्यात आले आहे. तसेच शैक्षणिक साहित्याचा खर्च वेगळा आकारणे आवश्यक येईल. त्याचप्रमाणे पूर्व प्राथमिकचे ज्युनिअर के.जी ते इयत्ता आठवीपर्यंतच्या रिक्त जागा व वार्षिक शुल्कबाबतचा तपशील जगदगुरु संत तुकाराम महाराज संतपीठ स्कूल अॅन्ड ज्युनियर कॉलेजच्या www. santpithpcmc.com संकेत स्थळावर उपलब्धतेनुसार प्रसिद्ध करणेत येईल.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.