PCMC : साेसायट्यांमधील एसटीपीवर आता खासगी संस्थेचा ‘वाॅच’!

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील माेठ्या सोसायट्यांना सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सुरू ( PCMC) ठेवणे बंधनकारक असताना हा प्रकल्प बंद ठेवत असल्याचे समाेर आले. त्यामुळे महापालिकेने एसटीपी कायमस्वरूपी कार्यान्वित राहण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी खासगी सल्लागार संस्थेची नेमणूक करणार आहे. त्यासाठीचे दरपत्रक 30 जानेवारीपर्यंत महापालिकेने मागविले आहे.

केंद्र शासन व राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाने दहा हजार चौरस मीटर व त्यापेक्षा मोठ्या क्षेत्रफळाच्या भूखंडावरील सोसायट्यांना सांडपाणी प्रक्रिया करुन त्याचा पुनर्वापर करणे बंधनकारक केले आहे. महापालिकेने शहरातील 331 बड्या साेसायट्यांच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची खासगी एजन्सीमार्फत पाहणी केली. तसेच सोसायट्यांच्या मैलाशुद्धीकरण केंद्राची नियमित तपासणीही करण्यात येत आहे.

Chinchwad : पदयात्रेच्या मार्गावर हजारो पोलीस तैनात; पदयातेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांची चौफेर नजर

यामध्ये 284 साेसायट्यांमध्ये प्रकल्प सुरू असल्याचे पाहणीत आढळून आले. तर 47 साेसायट्यांमध्ये सांडपाणी प्रकल्प बंद असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर या सर्व साेसायट्यांना महापालिकेच्या पर्यावरण विभागामार्फत दाेन वेळा नाेटीसा देण्यात आल्या. नाेटीसा मिळताच सहा साेसायटीमध्ये प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला. तर नाेटीसा मिळवूनही केराची टाेपली दाखविणा-या 41 सोसायट्यांचे नळ कनेक्शन ताेडण्याचा महापालिकेमार्फत इशारा देण्यात आला हाेता.

मात्र, या कारवाईला साेसायटीधारकांकडून जाेरदार विराेध झाल्याने कारवाई बारगळली.  त्यानंतर आता महापालिकेच्या पर्यावरण विभागाने साेसायट्यांमधील एसटीपी कायमस्वरूपी कार्यान्वित राहाव्या, यासाठी खासगी सल्लागार संस्थेची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीचे दरपत्र मागविण्यात आले आहे. 30 जानेवारीपर्यंत सीलबंद पाकीटातून दर सादर करण्याचे आवाहन केले आहे.

हे काम करणार संस्था

सल्लागार एजन्सीने सर्व खाजगी एसटीपीची प्रत्यक्ष भेट देणे, साप्ताहिक अहवाल पर्यावरण अभियांत्रिकी विभागाला सादर करणे,  एसटीपी कार्यान्वित असल्याबाबतची माहिती मनपा संकेतस्थळावर अपलाेड करणे, सोसायटीमध्ये योग्य क्षमतेचा एसटीपी आहे काय? एसटीपी कोणत्या तंत्रज्ञानावर आधारीत आहे. ज्या तंत्रज्ञानावर आधारीत आहे, त्यानुसार क्षमता योग्य आहे का? सोसायटीचे ड्रेनेज कनेक्शन मनपा ड्रेनेज लाईनला आहे का? एसटीपीमध्ये सांडपाण्यावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार प्रक्रिया करण्यात येते का? प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर करण्यात येतो का?  हे काम संस्थेला पाहावे लागणार ( PCMC) आहे.

 

शहरातील माेठ्या सोसायट्यांना सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सुरू ठेवणे बंधनकारक आहे. मात्र,  काही साेसायट्या हा प्रकल्प बंद ठेवत आहेत. एसटीपी कायमस्वरूपी कार्यान्वित राहण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी खासगी सल्लागार संस्थेची नेमणूक करणार आहे. त्यासाठीचे निविदा दरपत्रक मागविण्यात आले आहे.
– हरविंदर बन्सल, कार्यकारी अभियंता, पर्यावरण विभाग

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.