Chinchwad : पदयात्रेच्या मार्गावर हजारो पोलीस तैनात; पदयात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांची चौफेर नजर

एमपीसी न्यूज – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबई शहरात होणाऱ्या उपोषणाला ( Chinchwad ) जरांगे पाटील व लाखो मराठा बांधव जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून 20 जानेवारी रोजी मुंबईकडे निघाले आहेत. ही पदयात्रा मंगळवारी (दि. 23) दुपारी पुणे जिल्ह्यात दाखल झाली. बुधवारी (दि. 24) ही पदयात्रा पिंपरी चिंचवड शहरात दाखल होणार आहे. पदयात्रेत लाखो मराठा बांधव सहभागी झाले आहेत.

पदयात्रा शांततेत पार पाडण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी मोठा फौजफाटा पदयात्रा मार्गावर तैनात केला आहे. शहरात येणाऱ्या पदयात्रेच्या पार्श्वभूमीवर एक अतिरिक्त आयुक्त, सहा उपायुक्त, 12 सहाय्यक आयुक्त, 60 पोलीस निरीक्षक, 100 सहाय्यक निरीक्षक / उपनिरीक्षक आणि सुमारे एक हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. पदयात्रेच्या पूर्वसंध्येलाच हा सगळा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Pune : ‘महाज्योती’चे 638 विद्यार्थी एमपीएससी परीक्षेच्या अंतिम यादीत

पदयात्रा बुधवारी दुपारी 12 वाजता सांगवी फाटा येथे येईल. 12.30 वाजता जगताप डेअरी, 1.00 वाजता काळेवाडी फाटा, 1.30 वाजता 16 नंबर बस स्टॉप, 2.00 वाजता डांगे चौक, 2.30 वाजता जकात नाका/चिंचवडे लॉन्स, 3.00 वाजता चापेकर चौक, 3.30 वाजता चिंचवड स्टेशन, 4.00 वाजता आकुर्डी, 4.30 वाजता निगडी, 5.00 वाजता भक्ती शक्ती चौक येथून ही पदयात्रा मुंबईच्या दिशेने जाणार आहे. बुधवारी ही पदयात्रा लोणावळा येथे मुक्कामासाठी थांबणार आहे.

कोल्हापूर, सातारा, सांगली येथून हजारो वाहने पिंपरी चिंचवड शहरात दाखल झाली आहे. या शहरातील मराठा बांधव पिंपरी चिंचवड शहरातून पदयात्रेत सहभागी होणार आहेत. त्यामुळे जुना पुणे – मुंबई महामार्ग आणि पुणे – मुंबई द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पिंपरी चिंचवड शहरात देखील आजवरची रेकॉर्डब्रेक गर्दी पाहायला मिळणार आहे.

पदयात्रेत सहभागी होणाऱ्या बांधवांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी विविध संस्था, संघटना पुढे आल्या आहेत. पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयाच्या तीन रुग्णवाहिका स्टँड बाय ठेवण्यात आल्या आहेत. एक रुग्णवाहिका सांगवी फाटा, एक रुग्णवाहिका चापेकर चौक आणि तिसरी रुग्णवाहिका पिंपरी पोलीस स्टेशन येथे ठेवण्यात आली आहे. याशिवाय इतरही रुग्णवाहिका पदयात्रा मार्गावर असणार ( Chinchwad ) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.