PCMC: कर्मचा-यांच्या उत्तम कामगिरीमुळे महापालिकेचा नावलौकिक – अतिरिक्त आयुक्त जगताप

एमपीसी न्यूज – महानगरपालिकेची (PCMC) अनेक वर्ष सेवा करुन आज सेवानिवृत्त होणा-या कर्मचा-यांच्या उत्तम कामगिरीमुळे महापालिकेचा नावलौकिक वाढून जागतिक स्तरावर शहराची ओळख निर्माण झाली. त्याचे श्रेय सेवानिवृत्तांना देऊन त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी सेवानिवृत्त कर्मचा-यांना त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने माहे डिसेंबर 2022 अखेर सेवानिवृत्त होणा-या 33 कर्मचा-यांचा सत्कार अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या हस्ते दिवंगत मधुकरराव पवळे सभागृह येथे करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास विशेष अधिकारी किरण गायकवाड, कार्यकारी अभियंता विजयकुमार काळे, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, कर्मचारी महासंघाच्या चारुशीला जोशी तसेच कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचा-यांचे नातेवाईक उपस्थित होते.

Pune : विजयस्तंभाच्या अभिवादनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश जारी

माहे डिसेंबर 2022 मध्ये नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा-या अधिकारी आणि कर्मचा-यांमध्ये उपअभियंता लता बाबर, कार्यालय अधिक्षक विजयकुमार बाठे, लघुलेखक रेवती टिपणीस, मुख्य लिपिक नंदिनी सूर्यवंशी, वाहन चालक अनिल वाघमारे, कनिष्ठ अभियंता दिपक गरुड, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अनिल जांभळे, मिटर निरिक्षक राजेंद्र वाघेरे, उप अग्निशमन अधिकारी प्रताप चव्हाण, क्रीडा शिक्षक विवेक साबळे, उपशिक्षिका कांचन जोशी, मजूर श्रीकांत सिंह, यशवंत चोपडे, सुभाष चांदेकर, बाबू शेख, शिपाई रमेश शेडगे, सफाई कामगार छाया फाळके, रखवालदार बाळकृष्ण परब, हिरालाल सुंदेचा यांचा समावेश आहे.

तसेच स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या (PCMC) कर्मचा-यांमध्ये उपअभियंता शिल्पा गोखले, लेखापाल प्रकाश जोशी, कार्यालय अधिक्षक अनिल तापकीर, लक्ष्मण डगळे, मुकादम बाळु लोंढे, शिवपुत्र नंदर्गे, सफाई कामगार मंगला खंडाळे, आनंदा कदम, सफाई सेवक राजेश तेजी, कचराकुली अनिल दहातोंडे, विश्वास भिंगारदिवे, ज्ञानोबा ननावरे, गटरकुली आनंद गायकवाड, अरुण प्रधान यांचा समावेश आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशेष अधिकारी किरण गायकवाड यांनी सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी तर आभार कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.