Pune News : पुण्याहून अयोध्येला जाण्यासाठी रेल्वेसेवा सुरू करावी; अग्रवाल समाज फेडरेशन आणि प्रवाशांची मागणी

एमपीसी न्यूज : अध्यात्मिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक (Pune News) नगरी असलेल्या पुणे येथून अहमदनगर मार्गे कोट्यवधी हिंदूंचे केंद्रबिंदू असलेल्या भगवान श्री रामाचे जन्मस्थान असलेल्या अयोध्या शहरापर्यंत नियमित रेल्वे सुरु करावी. तसेच, हि ट्रेन अहमदनगर, मनमाड, प्रयागराज, प्रतापगड, सुलतानपूर मार्गे अयोध्यापर्यंत असावी अशी मागणी पुण्याच्या अग्रवाल समाज फेडरेशन तसेच प्रवासी, भक्त मंडळी आणि पर्यटकांनी केली आहे.

मध्य रेल्वेच्या पुणे विभागाच्या डीआरएम इंदुरानी दुबे यांना या संदर्भातील निवेदन 29 डिसेंबर रोजी सुपूर्द करण्यात आले. तत्पूर्वी पुणे शहर भाजप अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या वतीने रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना या संदर्भातील निवेदन देण्यात आले आहे. निवेदन स्वीकारल्यानंतर डीआरएम दुबे यांनी पुणे विभागाच्या वतीने अयोध्येपर्यंत रेल्वे धावण्यासाठी रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव पाठविण्याचे आश्वासन दिले आहे. गरज भासल्यास पुण्याहून अयोध्येसाठी विशेष ट्रेन चालवता येईल, असेही ते म्हणाले.

पुण्याच्या डीआरएम इंदुरानी दुबे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रभू श्रीराम हे कोट्यवधी हिंदूंच्या आस्था आणि श्रद्धेचे केंद्र असताना पुण्याहून अयोध्येला रेल्वे सेवा नाही. पुणे शहर म्हणजेच पुण्यनगरी हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे शहर आहे, तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचेही निवासस्थान आहे. या नगरीची भगवान रामावर नितांत श्रद्धा आहे. त्यामुळे येथून दररोज मोठ्या संख्येने रामभक्त, प्रवासी आणि पर्यटक अयोध्येला जातात, तर येथून त्यांच्यासाठी थेट रेल्वे सेवा नाही. अयोध्या आणि पुण्याचे अतिशय प्राचीन नाते आहे. यामुळेच श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष श्री गोविंदगिरी जी महाराज यांनी आळंदी येथून श्री राम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र न्यासच्या खजिनदार पद निवडले होते. श्री गोविंदगिरी महाराज यांनी डीआरएमला सादर केलेल्या या निवेदनावर आपली स्वाक्षरी देखील केली आहे आणि पुणे त्यांनी (Pune News) अयोध्येपर्यंत ट्रेन चालवण्याची मागणी केली आहे.

PCMC: कर्मचा-यांच्या उत्तम कामगिरीमुळे महापालिकेचा नावलौकिक – अतिरिक्त आयुक्त जगताप

पुणे-अयोध्याही रेल्वे प्रयागराज-प्रयाग-प्रतापगड-सुलतानपूर-भरतकुंड मार्गे अयोध्येसाठी चालवण्यात यावी, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की, या रेल्वे मार्गावर तीर्थराज प्रयाग आणि गंगा, यमुना आणि सरस्वतीचे पत्रा संगम तीर्थ आहे. या रेल्वे मार्गावर प्रतापगडमध्ये मनगढधाम आणि पर्यटनस्थळे आहेत. या रेल्वे मार्गावर सुलतानपूर म्हणजेच प्राचीन कुशभवनपूर आहे; जेथे सीताकुंड, धोपाप आणि बिजेथुआ महाबिरण सारखी प्रभू रामाची तीर्थक्षेत्रे आहेत. या रेल्वे मार्गावर भरतकुंड आहे; जेथे भगवान रामाचे धाकटे भाऊ भरत याने 14 वर्षे तपश्चर्या करून हनुमानजींना आपल्या बाणांनी पृथ्वीवर आणले होते.

डीआरएमला दिलेल्या निवेदनावर 300 हून अधिक भाविक आणि प्रवाशांनी आपल्या सह्या केल्या आहेत. याशिवाय नगरसेवक योगेश तुकाराम मुळीक, नगरसेवक ऍड. अविनाश राज साळवे, पुणे शहर भाजपचे अध्यक्ष जगदीश मुळीक, भाजपचे उत्तर भारतीय युवा मोर्चाचे अध्यक्ष सूरज दुबे, चंदादेवी चॅरिटेबल ट्रस्ट, पंतप्रधान नरेंद्र मोदी पुरस्कारप्राप्त देश के सच्चे हिरो प्रतिष्ठान आणि महाराजा अग्रसेन किचन ट्रस्ट आणि शहरातील विविध गणेश मंडळे यांचा समावेश आहे.

डीआरएम इंदुरानी दुबे यांना निवेदन देण्यासाठी गेलेल्या (Pune News) शिष्टमंडळात अग्रवाल समाज फेडरेशनचे मुख्य समन्वयक संजीव ओमप्रकाश अग्रवाल, विश्वप्रसिद्ध फौलादी फाइटर व प्रखर रामभक्त रवी रामजी पांडे, सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ता संजय पांडे, नगरसेवक संजय शशिकांत भोसले, भाजपाचे उत्तर भारतीय युवा मोर्चा अध्यक्ष सूरज दुबे, शिवसेना भारतीय कामगार सेनाचे शैलेश पाला मोरे, येरवडा मानस मंडळ प्रमुख पदाधिकारी सहभागी होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.