SSC-HSC Exam : दहावी-बारावीचे अंतिम वेळापत्रक जाहीर

एमपीसी न्यूज : दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या (SSC-HSC Exam) अंतिम वेळापत्रकाची प्रतीक्षा आता संपली आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. बारावीची लेखी परीक्षा ही 21 फेब्रुवारी 2023 ते 21 मार्च 2023 तर दहावीची लेखी परीक्षा 2 मार्च 2023 ते 25 मार्च 2023 या कालवधीत होणार आहे.

Pune News : पुण्याहून अयोध्येला जाण्यासाठी रेल्वेसेवा सुरू करावी; अग्रवाल समाज फेडरेशन आणि प्रवाशांची मागणी

प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा आणि अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना कळविण्यात येणार आहे. परंतु, लेखी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांना आता त्यांच्या अभ्यासाचं आणि शाळांना त्यांच्या अभ्यासक्रमाचं नियोजन करणं शक्य होणार आहे. मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकाची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी (SSC-HSC Exam) माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असणार आहे.

सविस्तर लिंक –  www.mahahsscboard.in

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.