Pimpri : टाटा मोटर्सचा टाटा एस गोल्ड – द ओरिजनल छोटा हत्ती

छोट्या व्यावसायिक वाहनांव्दारे स्थित्यंतर घडवून आणण्यास सज्ज

‘कामयाबी कल, आज और कल’या ब्रँडच्या थीमनुसार 3.75 लाख ही आकर्षक किंमत

एमपीसी न्यूज – टाटा मोटर्सने ‘टाटा एस गोल्ड – ओरिजनल छोटा हत्ती’ या छोट्या व्यावसायिक ट्रकचे अनावरण केले आहे. छोट्या व्यावसायिक वाहनांच्या विभागात हा ट्रक नवा मापदंड प्रस्थापित करण्यास सज्ज आहे. महान टाटा एस हे टाटा समूहाच्या कल्पकता आणि अग्रगण्य स्पिरिटचे प्रतीक आहे. विस्तृत संशोधन आणि ग्राहकांच्या लोकप्रिया मागण्यांवर आधारित, ग्राहकांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी टाटा एस गोल्डचे अनावरण केलेले आहे. टाटा एस गोल्ड 3.75 लाख या आकर्षक किंमतीला मिळणार असून टाटा एस गोल्ड हा मिनी ट्रक आर्क्टिक व्हाइट रंगामध्ये उपलब्ध आहे. दमदार कामगिरीसाठी सज्ज असलेला हा मिनी ट्रक टाटा मोटर्सच्या सर्व अधिकृत डीलरशीपकडे आजपासून विक्रीसाठी उपलब्ध आहे. दमदार कामगिरी, दणकटपणा, वाढीव सुरक्षा आणि आरामदायीपणा यांचा मिलाफ असलेली टाटा एस गोल्ड ही ग्राहकांचे जीवनमान बदलण्यासाठी, रोजगारनिर्मितीच्या संधी उपलब्ध करण्यासाठी आणि तरुणांना उद्योजक बनण्याकरिता प्रेरित करण्यासाठी सज्ज झाली आहे.

ऑपरेटिंग खर्च कमी करण्याचे वचन, दणकट आणि विश्वनसीय अॅग्रिगेट्स, सर्वात आरामदायी आणि चालवण्यासाठी सुरक्षित, दमदार 702 सीसी सिलेंडर आयडीआय इंजिनने सुसज्ज, धोका कमी, कमी खर्चात सर्वाधिक मोबदला देणारे वाहन आणि देखभाल-दुरुस्तीसाठी सोपो अशी महत्त्वाची वैशिष्टे टाटा एस गोल्डची आहेत. टाटा एस गोल्ड ही नव्याने तयार करण्यात आलेला पुढील बाजूचा दर्शनीय भाग, सुधारित एर्गोनॉमिक्ससह स्टीअरिंग व्हील आणि उपयुक्ततापूर्ण डॅशबोर्ड अशा दमदार गुणवैशिष्ट्यांसह ग्राहकांच्या भेटीला आली आहे. त्याचबरोबर सर्वोत्तम राइड, स्टाइल आणि आकर्षक किंमत यांचा मिलाफ असलेले हे वाहन देशभरातील असंख्य उद्योजकांसाठी, तसेच मार्केटमधील वजनी वाहतूक करणा-यांसाठी त्यांच्या व्यवसायाचा एक अपरिवार्य भागीदार बनण्यास सज्ज झाले आहे.

टाटा मोटर्सच्या कमर्शियल व्हेईकल बिझिनेसचे अध्यक्ष गिरीश वाघ यांनी सांगितले की, टाटा मोटर्सने भारतातील छोट्या व्यावसायिक वाहनांच्या विभागात आपला वैविध्यपूर्ण पोर्टफोलियो विस्तारित करण्यात अग्रस्थान पटकावले आहे. भारतीय बाजारातील 68 टक्के हिस्सा काबीज करत टाटा मोटर्सने मिनी ट्रकच्या या विभागात अापले अग्रस्थान अधिक मजबूत केले आहे. टाटा एसची 20 लाखांपेक्षा जास्त (2 दशलक्ष) वाहने भारतीय रस्त्यांवर धावत असून टाटा एसने ग्राहकांशी आपले भावनिक नाते अधिक मजबूत केले आहे. टाटा एस गोल्ड हे अधिक गुणवैशिष्ट्यांनी सज्ज असलेले वाहन 3.75  लाख रुपयांना आम्ही सादर केले असून आमच्या ग्राहकांच्या गरजा अधिक आकर्षक पद्धतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. एस कुटुंबातील अन्य उत्पादनांप्रमाणे, टाटा एस गोल्ड हे वाहन देशातील अखेरच्या टप्प्यापर्यंत वाहतूक करण्यासाठीचे एक उत्तम साधन ठरणार असून देशभरात उद्योजकतेला वाव देणारे ठरणार आहे.

2005 मध्ये सादर करण्यात आलेल्या टाटा एसने भारतातील मिनी ट्रकच्या संकल्पनेत क्रांती घडवून आणली होती. ग्राहकांना अविस्मरणीय अनुभव प्रदान करण्यासाठी या वाहनाचे डिझाइन आणि विकसित करण्यात आले असून वाहतूकदारांना अधिकाधिक महसूल मिळवून देण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. टाटा एस गोल्ड हा मिनी ट्रक छोट्या व्यावसायिक वाहनांच्या विभागात अष्टपैलू कामगिरी करत असून सर्वोत्तम स्थान पटकावले आहे. वाहतूकदारांना आपला व्यवसाय वृद्धिंगत करण्याची संधी देणारे, सर्वोत्तम सुरक्षा प्रदान करणारे तसेच कोणत्याही वातावरणात अष्टपैलू कामगिरी करणारे, सहजपणे दुरुस्त होणारे, आरामदायी आणि ग्राहकांसाठी कमी खर्चिक असलेले हे वाहन आहे. आतापर्यंत टाटा एसने 15 उत्पादने प्रदान केली आहेत. इंजिन टाइप, इंजिन पॉवर, बॉडी काँफिगरेशन यांवर आधारित एस, झिप, मेगा, मिंट ही छोट्या व्यावसायिक विभागातील वाहने तसेच ग्रामीण आणि शहरी भागातील प्रवासी वाहतुकीसाठी मॅजिक, मंत्रा आणि आयरिस ही प्रवासी वाहने टाटा मोटर्सने सादर केली आहेत.

ग्राहकांची वाढती मागणी लक्षात घेता, टाटा मोटर्सने सर्व विभागांमध्ये वर्कशॉप्स उभारली आहेत. देशभरातील सर्वच रस्त्यांवर टाटा मोटर्सच्या वर्कशॉप्सचे जाळे पसरले असून टाटा मोटर्सने 1800 सर्विस सेंटर उभारली आहेत. त्याचबरोबर प्रत्येक 62 किलोमीटरच्या अंतरावर एक वर्कशॉप उभारले आहे. ग्राहकांना आणि वाहनाच्या ड्रायव्हरला सेवा प्रदान करताना तसेच वाहनाची दुरुस्ती करताना मनाची शांती प्रदान करण्याचे उद्दिष्ट टाटा मोटर्सने ठेवले आहे. सर्वाधिक मोठे आणि भक्कम असे जाळे प्रस्थापित करताना टाटा मोटर्सने त्यात कायम सुधारणा केल्या आहेत. वेळप्रसंगी नवनवीन सादरीकरणे केले आहे. त्याचबरोबर मार्केटिंगच्या उद्देशाने नवनवीन कल्पना सादर करत टाटा मोटर्सने भारतीय बाजारात आपले अग्रस्थान कायम राखले आहे. आता छोट्या व्यावसायिक वाहनांच्या उद्योगातही टाटा मोटर्सने उत्तुंग भरारी घेतली आहे.

"Sammelan"

"Sammelan

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.