Pimpri : पवना धरणात 89 टक्के पाणीसाठा; मे अखेर पाण्याची चिंता नाही

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणाऱ्या मावळातील (Pimpri) पवना धरणात आजच्या तारखेला 89 टक्के पाणीसाठा आहे. हा साठा मे अखेर पर्यंत पुरेल एवढा आहे. त्यामुळे शहरवासीयांना पाण्याची चिंता नाही.

महापालिका दिवसाला पवनातून 510, चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्रातून 70 आणि  एमआयडीसीकडून 13 असे 593 एमएलडी पाणी उचलते. यंदा पवना धरण परिसरात 2 हजार 833 मिली मीटर पावसाची नोंद झाली होती.

त्यामुळे सप्टेंबरअखेर धरणात 100 टक्के पाणीसाठा होता. पवना  धरणात आजमितीला 89 टक्के पाणीसाठा असून गतवर्षी आजच्या तारखेला 91 टक्के पाणीसाठा होता. 89 टक्के पाणीसाठा हा मे अखेर पर्यंत पुरेल मात्र जूनमध्ये पावसाने ओढ दिल्यास पाणी कपातीला सामोरे जाऊ लागू शकते.

Pune : येरवड्यात झिका व्हायरसची चार जणांना लागण, सलग तीन आठवड्यांपासून परिसरात सर्वेक्षण सुरु

दरम्यान, महापालिकेने 25 नोव्हेंबर 2019 पासून समान पाणीपुरवठा करण्यासाठी एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला. मागील चार वर्षांपासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरु आहे.   त्यामुळे पाण्याच्या तक्रारींमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली.

उंचावरील भागातील पाणीपुरवठा सुरळीत झाला. कमी दाबाने, पुरेशा पाणी येण्याच्या तक्रारी पूर्णपणे घटल्याचा प्रशासनाचा दावा आहे. त्यामुळे दिवसाआड पाणीपुरवठा कायम ठेवण्यासाठी  प्रशासन आग्रही असल्याचे दिसून येते.

पवना धरणाचे शाखा अभियंता रजनीश बारिया म्हणाले, “घाटमाथा असल्याने मावळ पट्ट्यात चांगला पाऊस झाला. त्यामुळे सप्टेंबर अखेरपर्यंत धरणात 100 टक्के पाणीसाठा होता. धरणात आजच्या तारखेला 89 टक्के पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा  मे अखेरपर्यंत पुरेल. त्यामुळे पाण्याची अडचण येईल, असे दिसत (Pimpri)  नाही”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.