MSRTC : दिवाळीत एसटीला धनलाभ; 20 दिवसात 510 कोटींचे उत्पन्न

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला (MSRTC) दिवाळीच्या कालावधीत (MSRTC) चांगलाच धनलाभ झाला आहे.1 ते 20 नोव्हेंबर या कालावधीत एसटीने तब्बल 510 कोटी रुपयांची कमाई केली. यामध्ये 20 नोव्हेंबर रोजीच्या उत्पन्नाने एसटीचे आजवरचे सर्व रेकॉर्ड तोडत एकाच दिवसात 37 कोटी 63 लाख रुपयांची कमाई केली.

प्रवाशांकडून एसटीला पसंती दिली जात आहे. दिवाळी सणानिमित्त गावी जाण्यासाठी अनेकांनी एसटीची निवड केली. वाट पाहीन पण एसटीनेच जाईन, हे ब्रीद जणू प्रवाशांनी पूर्ण केले. त्यामुळेच दिवाळीच्या दिवसात लाखो प्रवाशांनी एसटीने प्रवास करत एसटीच्या उत्पन्नात भर पाडली आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेले आंदोलन चिघळले आणि पुन्हा एकदा एसटी आंदोलकांच्या हाती सापडली. काही ठिकाणी एसटी बस पेटवून देण्याचे प्रकार घडले. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एसटीने अनेक भागातील आपली सेवा बंद ठेवली. याचा एसटीच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला.

Pimpri : पवना धरणात 89 टक्के पाणीसाठा; मे अखेर पाण्याची चिंता नाही

दरम्यान, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या तिकीट दरांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला. या भाडेवाढीला देखील प्रवाशांनी सकारात्मक घेत चांगला प्रतिसाद दिला. दिवाळी, दसरा, होळी, गणेशोत्सव अशा मोठ्या सणांच्या निमित्ताने एसटीकडून अधिकच्या गाड्या सोडल्या जातात. याच कालावधीत एसटीला अधिक उत्पन्न मिळवण्याची संधी असते. यावर्षीच्या दिवाळीला एसटीने या संधीचे सोने केले असल्याचे म्हटले जात आहे.

1 ते 20 नोव्हेंबर दरम्यान एसटीला 510 कोटी रुपये उत्पन्न मिळाले. त्यात 20 नोव्हेंबर रोजी एसटीच्या आजवरच्या 75 वर्षांच्या कारकिर्दीतील विक्रमी 37 कोटी 63 लाख रुपये उत्पन्न मिळाले. नोव्हेंबर महिन्यात एसटीला सुमारे 800 कोटी रुपये उत्पन्न मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जात (MSRTC) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.