Pimpri : अॅड. सुनील कड यांचे अपघाती निधन

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेट बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. सुनील कड (वय 50) यांचे बुधवारी (दि. 30) निधन झाले. मोरवाडी न्यायालय परिसरात 15 जानेवारीला अवजड बसच्या धडकेने त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली होती. त्या दिवसांपासून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

त्याच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाची वार्ता सर्वांना चटका लावून गेली. अॅड. कड हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या लीगल सेलचे अध्यक्षही होते. कड यांचे अवयवदान करण्याचा निर्णय त्यांच्या कुटुंबीयांनी घेतला आहे. आज, गुरुवारी (दि. 31) अॅड. कड यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेट्स बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सुनील कडुसकर यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.