Bhosari : बेकायदेशीर गुटखा बाळगल्याप्रकरणी तरुणाला अटक

एमपीसी न्यूज – अन्न सुरक्षा तपासी पथकाने भोसरीतील महात्मा फुलेनगर येथून 21 वर्षीय तरुणाकडून तब्बल 17 हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. याप्रकरणी तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 29) दुपारी अडीचच्या सुमारास करण्यात आली.

आकाश विजय पाटील (वय 21 रा. महात्मा फुलेनगर, भोसरी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी अरुण श्रीराम धुळे यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्न सुरक्षा तपासी पथकाने आकाशला महात्मा फुले नगर येथून अटक करत त्याच्याकडून 16 हजार 940 रुपयांचा गुठखा जप्त केला. त्याच्यावर महाराष्ट्र शासनाच्या गुटखा प्रतिबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास भोसरी एमआयडीसी पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.