Bhosari : शेत जमिनीच्या वादातून पाच जणांकडून तीघांना मारहाण

एमपीसी न्यूज – शेतीला कुंपण आणि फलक लावत असताना पाच जाणांनी बेकादेशीररित्या जमाव जमवून तिघांना शिवीगाळ करत मारहाण केली आहे. ही घटना सोमवारी (दि. २८) दुपारी दोनच्या सुमारास घडली.

दशरथ बाळु बोराटे (वय 53, रा. बोराटे वस्ती, मोशी) यांनी याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार बाळासाहेब दशरथ सस्ते (वय 62), दिगंबर शिवाजी सस्ते (वय 30), राकेश शिवाजी सस्ते, विष्णु बाबुराव सस्ते (वय 53), अक्षय विष्णु सस्ते (वय 25, सर्व रा. सस्तेवाडी, मोशी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलल्या माहितीनुसार, बोराटे आणि त्यांचे दोन भाऊ हे बो-हाडेवाडी येथील त्यांच्या शेतात कुंपण आणि फलक लावण्याचे काम करत होते. त्यावेळी आरोपी तेथे आले व त्यांनी या तिघांशी वाद घालण्यास सुरुवात केली. आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या भावांना शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. तसेच ‘ही काय तुमच्या बापाची जमीन आहे का’ असे मोठमोठ्याने ओरडत बोराटे यांना जिवे मारण्याची धमकी दिली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.