Pimpri : किमान वेतनसाठी बिडी कामगार उतरले रस्त्यावर

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य विडी कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघतर्फे महाराष्ट्र बीडी ऊद्योग संघाचे अध्यक्ष सुधीर साबळे यांच्या साबळे वाघीरे कारखान्यासमोर किमान वेतनाची अंमलबजावणी करण्यासाठी बिडी कामगारांनी धरणे आंदोलन केले.

महाराष्ट्र शासनाच्या दि. 10/11/2014च्या अधिसूचनेप्रमाणे प्रती हजार बीडीस रूपये 210 किमान वेतन फरकासहीत मिळावे, याकरिता मोठ्या संख्येने बीडी ऊद्योगातील कामगार सहभागी झाले होते.

  • पुढील 45 दिवसात किमान वेतनाची अमंलबजावणी न झाल्यास महाराष्ट्र व्यापी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा उमेश विस्वाद सरचिटणीस महाराष्ट्र राज्य विडी कामगार संघने दिला आहे.
    या आंदोलनाचे नेतृव अध्यक्ष अर्जुन चव्हाण, सेक्रेटरी सचिन मेंगाळे, वासंती तुम्मा, राधाबाई जरबंडी, लक्ष्मी मंडाल, नसरीन सय्यद यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.