Pimpri : केंब्रिज चाम्स इंटरनॅशनल प्री स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

एमपीसी न्यूज – केंब्रिज चॅम्प्स इंटरनॅशनल प्री स्कूल कृष्णा नगर ब्रांच व पिंपरी चिंचवड ( Pimpri) शहरातील सर्व ब्रांच मधील चिमुकल्याने उत्साहात वार्षिक स्नेहसंमेलमध्ये भाग घेतला होता.

Alandi : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर सुद्धा इंद्रायणी नदी फेसाळलेलीच!

यावेळी केंब्रिज इंटरनॅशनल प्री स्कूलचे  चेअरमन  माननीय धनंजय वर्णेकर, पिंपरी चिंचवड महापालिका सहायक आयुक्त अण्णा बोदडे, एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय राजेंद्र निकाळजे तसेच माजी महापौर अपर्णा डोके, सुरेश भोईर, सोनाली कुटे, अमोल काळे,नरेश टिळेकर, नम्रता जवंजाळ व स्मिता आदी उपस्थित होते.

यावेळी मुलांसोबत त्यांच्यासोबत पालकांनीही मनमुराद आनंद घेऊन स्नेहसंमेलना मध्ये एक नवचैतन्य निर्माण करून दिले होते. हिंदी मराठी इंग्रजी  देशभक्तीपर गीते अशा वेगवेगळ्या गाणी सादर करण्यात आली.

तसेच कृष्णा नगर  ब्रांचचे डायरेक्टर  कीर्ती मारुती जाधव व मारुती गणपत जाधव यांनी आभार ( Pimpri)  व्यक्त केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.