Alandi : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर सुद्धा इंद्रायणी नदी फेसाळलेलीच!

एमपीसी न्यूज : इंद्रायणी नदी काठच्या गावातील (Alandi) मैला मिश्रित सांडपाणी तसेच कारखान्यातील रसायन युक्त सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता ते सांडपाणी इंद्रायणी नदी पात्रात सोडले जाते. यामुळे इंद्रायणी नदी वारंवार फेसाळलेली दिसून येत आहे. आज दि.15 रोजी सुद्धा इंद्रायणी नदी जलप्रदूषणामुळे फेसाळलेली होती.

सद्यस्थितीत इंद्रायणी नदीचे पाणी काळवंडलेले दिसून येत आहे. आळंदी येथील जुन्या बंधाऱ्यातून ते पाणी नदीपात्रात पडल्यावर त्याचा बऱ्याचशा प्रमाणात पांढरा फेस तयार झाला होता. तसेच त्या पांढऱ्या फेसावरती काळसरपणा आल्याचे काही ठिकाणी दिसून येत होते.

Pune : ब्राह्मण इंडस्ट्रियल अँड ट्रेडर्स ऑर्गनायझेशन’ चे उदघाटन

उगमापासून संगमापर्यंत इंद्रायणी नदीचे वाढते प्रदूषण आणि नदीला आलेले फेसाळयुक्त पाणी (Alandi) या पार्श्वभूमीवर शनिवारी दि.13 रोजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आधिकाऱ्यांनी इंद्रायणी नदी प्रवाहातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा तसेच प्रमुख ग्रामपंचायती यांना भेटी दिल्या होत्या. (त्यावेळी आळंदीतील इंद्रायणी नदीपात्रातील काळवंडलेल्या पाण्याची पाहणी केली. व कुबेर गंगा ओढ्यावर फायटोरीमेडीएशन तत्वावर उभारल्या जात असणाऱ्या प्राथमिक प्रक्रिया प्रकल्पास भेट देण्यात आली होती.) संपूर्ण मार्गावरील नदीप्रवाहास येऊन मिळणाऱ्या सर्व प्रमुख सांडपाणी स्त्रोतांची पाहणी केली व माहिती घेतली होती. तसेच शहराच्या मलनि:सारण प्रकल्पांचा सद्यस्थितीत आढावा घेतला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.