Pune : ब्राह्मण इंडस्ट्रियल अँड ट्रेडर्स ऑर्गनायझेशन’ चे उदघाटन

एमपीसी न्यूज – ब्राह्मण महासंघ संचालित ‘ब्राह्मण इंडस्ट्रियल अँड ट्रेडर्स ऑर्गनायझेशन'(बिटो) (Pune)चे उदघाटन रविवारी सायंकाळी हॉटेल शांताई येथे पार पडले.

यावेळी कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे,एमएसएमई(मुंबई) चे अध्यक्ष अभय दफ्तरदार ,जनता बँकेचे संचालक अभय माटे,’अभि ग्रुप’ चे जितेंद्र जोशी ,अभिषेक जोशी ,मिलिंद तारे ,मनोज तारे , महेंद्र मणेरीकर यांच्या उपस्थितीत झाले.

या प्रसंगी ब्राह्मण महासंघचे सर्व पदाधिकारी, ‘ब्राह्मण इंडस्ट्रियल अँड ट्रेडर्स ऑर्गनायझेशन’ (Pune)चे सर्व संचालकांसहित महासंघच्या दोन्ही पतसंस्था आणि ‘देसी’या शैक्षणिक संस्थेचे संचालक मंडळ उपस्थित होते.
महिला जिल्हा अध्यक्ष विद्या घटवाई , डॉ.आरती कुलकर्णी यांनी सूत्र संचालन केले तर ‘ब्राह्मण इंडस्ट्रियल अँड ट्रेडर्स ऑर्गनायझेशन’ च्या संचालकांनी आभार मानले.

‘उद्योजकांनी सुरवात पासून उद्योगाचे अर्थकारण समजून घेऊन त्या पद्धतीने व्यवसाय केला तर भक्कम पायाभरणी होवून नंतर अडचणी येत नाही’, असे प्रतिपादन कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष , चार्टर्ड अकाऊंट मिलिंद काळे यांनी केले.ब्राह्मण महासंघाच्या ‘ब्राह्मण इंडस्ट्रियल अँड ट्रेडर्स ऑर्गनायझेशन'(बिटो) या उद्योजक आघाडी च्या उदघाटन निम्मित घेतलेल्या उद्योजक मेळाव्यात ते बोलत होते.एमएसएमई चे अध्यक्ष अभय दफ्तरदार यांनी सरकारच्या एमएसएमई चे फायदे सांगून युवकांनी त्याचा फायदा करून घ्यावा असं सांगितले.

Pune : डॉ. श्रावणी शहापुरे यांना ‘प्राइड ऑफ इंडिया मिसेस इंडिया ‘ बहुमान

जनता बँकेचे संचालक आणि माजी अध्यक्ष अभय माटे यांनी कर्ज देताना बँका नेमके काय पाहतात… व्यवसायाचे बँकिंग नेमके कसे असावे यावर मार्गदर्शन केले.युवा अध्यक्ष अभिषेक जोशी यांनी व्यवसायात दुसरी पिढी ही जास्त महत्वाची असते, पहिल्या पिढीचे यश नवीन संकल्पनांच्या आधारे वाढवण्याची त्यांची जवाबदारी असते असे मत व्यक्त केले.

मिलिंद तारे यांनी स्टार्ट अप इंडियाची सर्व धोरणे समजावून सांगितली तर पराग खेडकर यांनी पेटंटची कार्यप्रणाली आणि मुंबई येथील प्रसिद्ध उद्योजक महेंद्र मणेरीकर यांनी पहिल्या दहा वर्षात व्यवसायाकडे लक्ष देणे , धोका पत्करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.’अभि ग्रुप ‘चे जितेंद्र जोशी यांनी ग्लोबल इंडिया बिझनेस फोरम च्या साहाय्याने देशात नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला व्यवसाय नेण्यासाठी प्रयत्न करावा असे सांगितले.विश्वस्त मनोज तारे यांनी ब्राह्मण महासंघ ची तर सौ आदिती जोशी यांनी ‘ब्राह्मण इंडस्ट्रियल अँड ट्रेडर्स ऑर्गनायझेशन’ ची ध्येय आणि धोरणे विषद केली

या प्रसंगी ‘श्री राम मंदिराच्या 500 वर्षांच्या लढाई चा इतिहास ‘या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.