Pimpri Chinchwad – दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर झेंडूच्या फुलांनी बाजाराला आली बहर; खरेदीसाठी लोकांनी केली गर्दी

एमपीसी न्यूज – विजयादशमी अर्थात दसरा या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर (Pimpri Chinchwad)शहरातील मुख्य बाजारपेठांमध्ये झेंडूच्या फुलांची मोठी आवक झाली असून, रंगीबेरंगी फुलांनी बाजार बहरले आहे. सर्वत्र खरेदीसाठी लोकांनी मोठ्या संख्यने गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. यावेळी चांगली मोठी झेंडूची केशरी व पिवळ्या रंगाच्या फुलांना 100 ते 150 रुपये किलोचा भाव मिळाला.

शहरातील पिंपरी, चिंचवड, चिखली, भोसरी, निगडी (Pimpri Chinchwad)सांगवी अशा भागांमध्ये झेंडूच्या फुलांची मोठमोठी दुकान रस्त्यावर थाटल्याचे पाहायला मिळाले. आंब्याची, अशोकाची, केळीची पाने, विविध जमातीची फुले विक्रीसाठी बाजारात आली आहेत. त्यामुळे बाजाराला बहर आल्याचे चित्र पहायला मिळाले. घराच्या दारांना लावायची तोरणं, झुंबर, प्रकाशदिवे खरेदीसाठी लोकांनी मोठी गर्दी केली.

Sangvi : कुत्रा अंगावर सोडून महिलेला मारहाण

कृत्रिम फुलांच्या माळा, शोभेच्या वस्तू, रंगबेरंगी रांगोळी देखील बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत.

कापड बाजारात कपडे खरेदी करण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर वाहनांची खरेदी देखील मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. त्यासाठी वाहन निर्मिती कंपन्यांकडून मोठ्या ऑफर्स ठेवण्यात आल्या आहेत. ऐन सणासुदीच्या दिवसात सोने चांदीचे भाव वधारले असताना देखील दागिने खरेदीसाठी लोकांनी पसंती दर्शविल्याचे पाहायला मिळाले.

शहरात आज ठिकठिकाणी मोठ्याप्रमाणात अन्नदान करण्यात येत होते. प्रसाद घेण्यासाठी लोकांच्या रांगाचरांगा लागल्या होत्या.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.