Chakan : बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज प्रकरणे मंजूर करण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – शाखा अधिकारी पदावर काम करताना (Chakan) एकाने बनावट कागदपत्रे तयार करून त्या आधारे बँकेकडून कर्ज प्रकरण मंजूर करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार 21 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर या कालावधीत दि संगमनेर मार्चंटस को ऑप ली, शाखा चाकण येथे घडला.

विजय भगवान अडसूळ (वय ४८, रा. भोसरी) असे गुन्हा दाखल (Chakan)झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी प्रकाश अरुण बोंबले यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Mumbai : मराठा समाजातील भावांनो टोकाचे पाऊल उचलू नका, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भावनिक आवाहन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दि संगमनेर मार्चंटस को ऑप ली या बँकेच्या चाकण शाखेत शाखा अधिकारी पदावर काम करत होता. त्याने त्याच्या अधिकाराचा गैरवापर करून स्वतःच्या फायद्यासाठी बोगस ग्राहक पंचरास रंगनाथ रामचंद्र या नावाने खोटा दस्तऐवज बनवला.

जाणीवपूर्वक कर्ज प्रकरण मंजूर करून बँकेच्या रकमेचा अपहार करण्याचा प्रयत्न केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.