Pimpri : शिक्षण व्यवस्थेत महर्षी दयानंद यांचे संस्कार विधी ग्रंथातील विधींचा समावेश केला पाहिजे – ॲड. अश्विनी कुमार उपाध्याय

एमपीसी न्यूज – भारतीय शिक्षण व्यवस्थेत महर्षी दयानंद यांचे (Pimpri)संस्कार, विधी ग्रंथातील विधींचा आणि भारतीय कुटुंब संहितेचा समावेश केला पाहिजे असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील अश्विनी कुमार उपाध्याय यांनी केले.

हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठानच्या वतीने नवरात्र व विजयादशमीचे औचित्य(Pimpri) साधून हिंदू शौर्य दिन – विराट हिंदू मेळाव्याचे आयोजन शनिवारी चिंचवड येथे करण्यात आले होते. यावेळी ॲड. उपाध्याय यांचे रामराज्य आणि भारतीय संविधान या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी प्रा. डॉ. धनंजय सोमनाथ भिसे यांना स्व. प्रा. एकनाथ नाणेकर स्मृती समाज भूषण पुरस्कार 2023 आणि अरुण श्रीपती पवार यांना स्व. संजय आर्य स्मृती समाजभूषण पुरस्कार 2023 संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी संस्थेचे कार्यकारी संचालक पं. धर्मवीर आर्य, पद्मश्री गिरीश प्रभुणे, उपाध्यक्ष राजाभाऊ गोलांडे, सचिव उत्तम दंडीमे, समन्वयक कैलास बारणे, संयोजक सुहास पोफळे आदी उपस्थित होते.

Chakan : बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज प्रकरणे मंजूर करण्याचा प्रयत्न

ॲड. उपाध्याय यांनी सांगितले की, स्वातंत्र्यानंतर मॅकलेची शिक्षण व्यवस्था स्वीकारण्यात आली. यातील दोष समजण्यास 75 वर्षाचा काळ लागला. सध्याची शिक्षण व्यवस्था भेदभाव करणारी आहे. यातील अभ्यासक्रम व्यावहारिक पातळीवर योग्य नाहीत. त्यामुळे गुरुकुल शिक्षण व्यवस्थाच योग्य आहे. देशाच्या विकासातील सर्वात मोठा अडसर वाढती लोकसंख्या आहे.

देश स्वतंत्र झाला त्यावेळी 4 कोटी असणारी लोकसंख्य75 वर्षात 140 कोटी झाली. आजही देशात 80 कोटी गरीब आहे. देशात जर लोकसंख्या नियंत्रण कायदा झाला नाही, तर देश विनाशाच्या मार्गावर आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे सर्व यंत्रणेवर ताण निर्माण होतो. त्यासाठी एक भारतीय कुटुंब संहिता बनवणे आवश्यक आहे.

जगाला दहशतवाद आणि हिंसाचाराने विळखा घातला आहे. हिंसा रोखण्यासाठी भारतीय शिक्षणाबरोबरच भारतीय उपचार पद्धतीतही बदल होणे आवश्यक आहे. भारतीय आयुर्वेद, योग, प्राणायाम, निसर्गोपचार उपचार पद्धती चांगली असतानाही ऍलोपॅथीच्या प्रचार, प्रसार करणारे कायदे पंडित नेहरूंच्या काळात झाले ते बदलण्याची गरज आहे.

जल, जमीन, जंगल, भूक, भेसळ, गुन्हेगारी, आरोग्य, शिक्षण या सर्व समस्यांचे मूळ वाढत्या लोकसंख्येत आहे. आता लोकसंख्येवर नियंत्रण करण्याची गरज आहे. राजा दशरथ यांनी त्यांच्या राज्यात समान शिक्षण समान अभ्यासक्रम लागू केला होता. राम राज्यात एक पती, एक पत्नी., हम दो हमारे दो असे सूत्र होते.

रामासह त्यांच्या भावांनी एकच विवाह केला होता. रामसह त्यांच्या सर्व भावांना दोनच मुले होती, याचा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे. स्वातंत्र्यपूर्वकाळात मुघलांनी अखंड भारतावर ज्या ज्या प्रदेशात आक्रमण केले होते, तेथे बालविवाह यासारख्या अनिष्ट प्रथांचे प्रमाण जास्त आहे. तर महाराष्ट्र व दक्षिणेतील राज्यांमध्ये मुघलांचे आक्रमण छत्रपती शिवाजी महाराजांनी रोखले. त्यामुळे महाराष्ट्रासह दक्षिणेतील राज्यांमध्ये बालविवाहाचे प्रमाण व इतर अनिष्ट प्रथा कमी आहेत.

सध्याची समाज माध्यमे, बॉलीवूडमधील चित्रपट, टीव्हीच्या मालिका यांमधून भारतीय संस्कृतीवर घाला घातला जात आहे हे रोखण्यासाठी काम केले पाहिजे. अवघ्या विश्वाला कुटुंब समजणारी भारतीय संस्कृती जगातील सर्वात आदर्श व्रत संस्कृती आहे असेही ॲड. उपाध्याय यांनी सांगितले.

स्वागत, प्रास्ताविक उत्तम दंडीमे यांनी केले, सूत्रसंचालन श्रीकांत चौगुले तर आभार सुहास पोकळे यांनी मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.