Alandi : श्री विजयादशमी निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन

एमपीसी न्यूज : दरवर्षी प्रमाणे मागील ९८ वर्षांपासून श्री विजयादशमी निमित्त (Alandi) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन निघत असते.

या संचलनाच्या निमित्ताने हिंदू समाज मोठ्या उत्साहाने एकत्र तर येतोच आणि याचा परिणाम म्हणून सज्जन शक्तीचा एक प्रकारे दुर्जनांवर अंकुश बसतो.अशी माहिती यावेळी संघाच्या वतीने देण्यात आली.

Chakan : बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज प्रकरणे मंजूर करण्याचा प्रयत्न

या वर्षी आळंदी शहराचे पथसंचलन, दि. २४ रोजी सकाळी ७.४५ ला, पू. बन्सीबाबा (Alandi ) करवा धर्मशाळा, हनुमानवाडी, केळगाव येथून निघणार आहे.
ह. भ. प. सुभाष महाराज गेठे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील व या संचलनाला साधारणपणे २०० पेक्षा अधिक स्वयंसेवक गणवेशात उपस्थित राहतील.

या संचलनाच्या स्वागतासाठी सर्व माता बंधू भगिनीनी उपस्थित रहावे असे अहवान रा.स्व.संघांच्या करण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.