Pimpri : राहुल गांधी यांच्या चुकीच्या वक्तव्याचा शहर भाजपकडून निषेध

एमपीसी न्यूज – स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या देशप्रेमाबाबत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी छत्तीसगड येथील प्रचारसभेत गेल्या आठवड्यात चुकीचे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करीत राहुल गांधी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी भापचे उपाध्यक्ष राजू दुर्गे यांनी पिंपरी पोलीस स्टेसनचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे लेखीनिवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनांत त्यांनी म्हटले आहे की, स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या देशप्रेमावर आणि त्यांनी देशासाठी केलेल्या कौतुकास्पद कार्यावर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी आक्षेपार्ह विधान करुन वीर सावरकर यांची प्रतिमा मालिन करण्याचे काम केले आहे. त्यांचे हे वक्तव्य सर्वसामान्य जनतेस चीड आणणारे आणि समाज भावना भडकविणारे आहे. हा त्यांनी अप्रत्यक्षरीत्या केलेला अदखलपात्र गुन्हा असुन पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता पार्टी याचा तीव्र निषेध करत आहे.

यावेळी राजू दुर्गे, महेश कुलकर्णी, सुरेश गादीया, अमृत पऱ्हाड, भीमा बोबडे, गंगाधर मंडगे, प्रतिभा लोखंडे, माधवी इनामदार, नंदा कारे, बिभीषण चौधरी, देविदास पाटील, प्रमोद ताम्हणकर, सुरेश पाटील, जयदेव डेमंरा, धर्मा पवार, जगदीश सोनवणे, मधुकर बच्चे, प्रदीप सायकर, दिलीप गोसावी, नारायण चव्हाण, जतिन बेटावदकर, संतोष घुले, अश्विन सपेरा, नानासाहेब वारे, भिकाजी भोज, वैजनाथ शिरसाठ, नंदू भोगले, सुरेश जाधवर, सुधीर चव्हाण, योगेश भागवत, सतपाल गोयल, सुनील सूर्यवंशी, आत्माराम राणे, लखन खरात आदी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.