Pimpri : पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी पोलीस पाटलांना केले मार्गदर्शन

एमपीसी न्यूज – पोलीस पाटलांना काम करताना येणाऱ्या अडचणींवर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी(Pimpri)  शुक्रवारी (दि.22) मार्गदर्शन केले आहे.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील, पोलीस पाटील यांचा मार्गदर्शन मेळावा व कार्यशाळा कार्यक्रम  देहूरोड पोलीस स्टेशन अंतर्गत देहुगाव येथील संत तुकाराम मंगल कार्यालय येथे संपन्न झाला. याप्रसंगी पिंपरी चिंचवड अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांनी पोलीस पाटलांना येणाऱ्या अडीअडचणी संदर्भात अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी आयुक्तालय हद्दीतील 80 पोलीस पाटील उपस्थित होते.

Pavana Dam update : अजूनही धरणातील पाणीसाठा 53 टक्यांवरच ; चोवीस तासात 61 मिली मीटर पाऊस

यावेळी पिंपरी चिंचवड सहाय्यक पोलीस आयुक्त पद्माकर घनवट,  महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाचे राज्याध्यक्ष बाळासाहेब बाजीराव शिंदे पाटील, पुणे जिल्हा पोलीस पाटील संघाचे जिल्हाध्यक्ष साहेबराव राळे पाटील, पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी पोलीस पाटील संघाच्या अध्यक्ष तृप्ती मांडेकर पाटील, खेड तालुका पोलीस पाटील संघाचे अध्यक्ष अमोल पाचपुते पाटील, मावळ तालुका पोलीस पाटील संघाचे अध्यक्ष लक्ष्मण शितोळे पाटील उपस्थित होते.

प्रमुख वक्ते व मार्गदर्शक डॉ राम पठारे सेवानिवृत्त पोलीस उपाधीक्षक व राज्य अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील यांनी पोलीस पाटलांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक.निशांत करंडे पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन अमोल पाचपुते पाटील यांनी तर सर्व उपस्थित यांचे आभार देहूरोड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी (Pimpri)  यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.