Pimpri : प्लॅस्टिक राष्ट्रध्वजचा वापर केल्यास दंडात्मक कारवाई

प्लॅस्टिक राष्ट्रध्वजचा वापर करु नका; महापालिकेचे आवाहन

एमपीसी न्यूज – प्लॅस्टिकचे राष्ट्रध्वज वापरण्यास बंदी आहे. त्यामुळे कोणीही प्लॅस्टिक राष्ट्रध्वजचा वापर करु नये, असे आवाहन पिंपरी महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे. प्लॅस्टिकचे राष्ट्रध्वज वापरल्यास, दुकानदारांनी विक्री केल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

शहरात 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी रोजी प्लॅस्टिकच्या छोट्या राष्ट्रध्वजची विक्री केली जाते. प्लॅस्टिक वापरण्यास राज्य सरकाने 23 मार्च 2018 रोजी बंदी घातली आहे. राष्ट्रप्रतिष्ठा अपमान प्रतिबंध 1971 चे तरतूदीनुसार राष्ट्रध्वजाचा कोणत्याही प्रकारे अपमान करणे ही बाब फौजदारी गुन्ह्यांस पात्र आहे. राष्ट्रध्वजाचा यथोचित सन्मान होणे आवश्यक आहे. त्यामुळे प्लॅस्टिकचा वापर करुन बनविण्यात आलेल्या राष्ट्रध्वजाचे उत्पादन, विक्री आणि वापरास प्रतिबंध घालण्यात आलेला आहे.

नागरिकांनी राष्ट्रध्वजाचा यथोचित सन्मान करावा. प्लॅस्टिकचा वापर करुन बनविण्यात आलेल्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नये असे आवाहन महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.