Pimpri : वटवृक्ष फाऊंडेशनची पिंपरी-चिंचवड शहरात स्थापना

एमपीसी न्यूज – पर्यावरण आणि वृक्ष संवर्धन यासाठी स्वयंसिद्ध ( Pimpri ) बनून कार्यरत पर्यावरण प्रेमींचे शहरात एकत्रीकरण करून पिंपरी-चिंचवड शहरात पर्यावरणासाठी सातत्यपूर्ण काम करण्याच्या दृष्टिकोनातून वटवृक्ष फाउंडेशनची स्थापना करण्यात आली आहे.

पर्यावरण अभ्यासक तानाजी एकोंडे अध्यक्षस्थानी होते. तर मानवी हक्क आणि संरक्षण जागृती या संस्थेचे अध्यक्ष अण्णा जोगदंड प्रमुख अतिथी होते. एकोंडे म्हणाले की,  सामाजिक कार्याचा वसा घेतलेले शंकर जगताप यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पिंपरी-चिंचवड शहरातील पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वटवृक्ष फाउंडेशन पिंपरी-चिंचवड शहर ही संस्था विधायक काम हाती घेऊन कार्यरत होत आहे याचा आनंद आहे.

Saswad EVM : सासवड ईव्हीएम चोरी प्रकरण; ‘त्या’ तीन अधिकाऱ्यांचे निलंबन रद्द

पिंपरी-चिंचवड शहरात वटवृक्षांचे प्रमाण कमी होत चालले आहे.  वडाचे झाड शुद्ध प्राणवायू सातत्याने देत असतात. झाडांचे संवर्धन करणे यासाठी तरुणाईला सोबत घेऊन या संस्थेने काम करावे.अण्णा जोगदंड म्हणाले की, भव्य रस्त्यांच्या कामामुळे  चिंच आणि वड या झाडांची हानी झाली आहे. चिंचवड या नावाने  पिंपरी-चिंचवड शहराची ओळख आहे. ती ओळख चिंच, वड, पिंपळ, औषधी कडुलिंब ही झाडे लावून पुन्हा करणे काळाची गरज आहे.

सामाजिक कार्यकर्ते सागर आंगोळकर म्हणाले की,  वटवृक्ष फाउंडेशनच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व विभागातील पर्यावरणावर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची एक फळी उभी करण्यात येणार आहे. झाडांचे संवर्धन व्हावे यासाठी स्वयंस्फूर्तीने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना विभागवार झाडे दत्तक घेऊन संवर्धन करण्याचे काम दिले जाईल.

याप्रसंगी पिंपळेगुरव परिसरातील राजमाता जिजाऊ उद्यानासमोर पिंपळ वृक्ष लावण्यात आला.  दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक यांनी पिंपळ वृक्ष लावताना तुकोबाच्या सोयऱ्यात विठू सावळा पहावा रामकृष्ण म्हणोनिया एक वृक्ष तो लावावा हे पर्यावरण संदेश देणारे गीत ( Pimpri ) सादर केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.