Hinjewadi: पार्सल कस्टम ऑफीसमध्ये अडकल्याचे सांगून तरुणाची 8 लाख रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज –  तुमचे पार्सल मुंबई कस्टम मध्ये अडकले असून त्यात (Hinjewadi)ड्रग्स व पासपोर्ट असल्याचे सांगून एका तरुणाची 7 लाख 96 हजार रुपयांची फसवणूक कऱण्यात आली आहे.हा सारा प्रकार 1 ते 2 एप्रिल 2024  रोजी बाणेर येथे ऑनलाईन पद्धतीने घडला आहे.

याप्रकरणी तरुणाने गुरुवारी (दि.4) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली (Hinjewadi)आहे,यावरून 8127325810 या मोबाईल क्रमांकावरून बोलणारा मनोज अग्रवाल , रवीचंद्र यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Thergaon : विनाकारण शिवीगाळ करत टेम्पो चालकाला मारहाण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  फिर्यादी यांना मनोज नावाच्या व्यक्तीने फोन करुन तुमचे पार्सल कस्टम ऑफीस मध्ये अडकले असल्याचे सांगितले.त्यामध्ये  5 पासपोर्ट, 3 क्रेडीट कार्ड, 4 किलो कपडे, 1 लॅपटॉप,200 ग्रॅम एम.डी.एम.ए.ड्रग्स असल्याचे सांगितले.

 

पिर्यादीला स्काईप एप डाऊनलोड करण्यास सांगून त्याद्वारे फिर्यादीला व्हिडीओ कॉल करायला सांगून त्यांचे लोकेशन ट्रेस केले व ते कुठे जातात, कोणाला बोलतात यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न आरोपींनी केला. यातून सुटका करायची असेल तर 7 लाख 96 हजार 425 रुपयांची अरटीजीेसद्वारे पैसे पाटवण्यास सांगून फिर्यादीची फसवणूक केली आहे. यावरून हिंजवडी पोलीस पुढील तपास पोलीस करत आहेत,

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.