Thergaon : विनाकारण शिवीगाळ करत टेम्पो चालकाला मारहाण

एमपीसी न्यूज –  विनाकारण एका टेम्पो चालक तरुणाला शिवीगाळ ( Thergaon) करत  मारहाण केली आहे. ही घटना 31 मार्च रोजी थेरगाव  येथे घडली आहे.

याप्रकरणी स्वप्निल महादेव गोडगे (वय 24 रा.थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिलीआहे. यावरून अतुल सावंत (वय 30) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Maharashtra : एसटीच्या ताफ्यात येणार 1 हजार 88 अतिरिक्त गाड्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे काम झाल्या नंतर त्यांचा टेम्पो पार्क करून घरी जात असताना आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ केली. यावेळी फिर्यादी यांनी हटकले असता आरोपीने लाकडी बांबूने फिर्यादीला मारहाण करत ( Thergaon) जखमी केले. यावरून वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.