Saswad EVM : सासवड ईव्हीएम चोरी प्रकरण; ‘त्या’ तीन अधिकाऱ्यांचे निलंबन रद्द

एमपीसी न्यूज – फेब्रुवारी महिन्यात पुरंदर तहसील कार्यालयातील स्ट्रॉग रूममधून ( Saswad EVM) ईव्हीएम मशीन मधून एक कंट्रोल युनिट चोरीला गेला. याप्रकरणी प्रांताधिकारी, तहसीलदार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निलंबित करण्याचे आदेश सरकारला दिले होते. मात्र, या प्रकरणात आपली काहीही चूक नसल्याचे तिन्ही अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरणात (मॅट) सांगितले. त्यानंतर न्यायाधिकरणाने हे निलंबन रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.

पुरंदर तहसील कार्यालयात स्ट्रॉग रूम बनवण्यात आली आहे. तिथे जनजागृतीसाठी ईव्हीएम मशीन ठेवल्या आहेत. त्यातील एका मशीन मधून एक कंट्रोल युनिट चोरीला गेला. हा प्रकार फेब्रुवारी महिन्यात घडला. चोरी झालेल्या दिवशी रविवार होता. त्यामुळे तहसील कार्यालय बंद होते. सोमवारी स्ट्रॉग रूमचा दरवाजा उघडा दिसला. त्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला.

Chikhali : बंद वाचनालय गर्दुल्यांचा अड्डा, हटकणाऱ्या नागरिकाला टोळक्याकडून मारहाण

दरम्यान, स्ट्रॉग रूममध्ये नेमणुकीस असलेले सहायक फौजदार डी एल माने आणि होमगार्ड राहुल जरांडे यांना निलंबित करण्यात आले. त्यानंतर या प्रकरणाची निवडणूक आयोगाने गांभीर्याने दखल घेतली. पुरंदरचे प्रांताधिकारी वर्षा लांडगे-खत्री, तहसीलदार विक्रम रजपूत, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बर्डे यांना निलंबित करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने सरकारला दिले. तसेच  विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांची चौकशी समितीही स्थापन करण्यात आली होती.

या आदेशाच्या विरोधात लांडगे, बर्ड आणि राजपूत यांनी मॅटमध्ये याचिका दाखल केली होती. ‘स्ट्रॉग रूममध्ये झालेल्या चोरीप्रकरणी तिघांचा कोणताही हलगर्जीपणा आढळून आला नाही. तसेच त्यांचा त्यात दोष नाही. त्यामुळे चूक नसताना आम्हाला निलंबन करणे योग्य नाही. त्यामुळे आमचे निलंबन रद्द करण्यात यावे,’ अशी विनंती याचिकाकर्त्यांच्यावतीने अॅड. पूनम महाजन यांनी केली होती.

यावर राज्य सरकार तसेच निवडणूक आयोगाला उत्तर देता आले नाही. त्यामुळे महाजन यांचा युक्तिवाद मान्य करून मॅटचे सदस्य न्या. व्ही. के. जाधव यांनी निलंबन रद्द करण्याचे सरकारला आदेश दिले. तसेच त्या तिघांची पूर्वीच्या ठिकाणी नियुक्ती करण्याचेही आदेश दिले ( Saswad EVM) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.