Pimpri : गहुंजे व शिवणे बंधार्‍यासाठी 29 कोटींचा खर्च

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने (Pimpri)  पवना नदीवर मावळ तालुक्यातील गहुंजे व शिवणे येथे कोल्हापूर पद्धतीच्या बांधण्यात येत असलेल्या बंधा-यासाठी 28 कोटी 78 लाखांचा खर्च येणार आहे. हा खर्च पाटबंधारे विभागास टप्प्याटप्प्याने देण्यात येणार आहे.

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने पवना नदीवर कोल्हापूर पद्धतीचे दोन बंधारे महापालिकेने स्वत:च्या खर्चाने बांधण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, महापालिकेकडून गहुंजे व शिवणे येथे बंधारा व पूल बांधण्यात येत आहे. गहुंजे बंधार्‍यासाठी 16 कोटी 63 लाख आणि शिवणे बंधार्‍यासाठी 12 कोटी 16 लाख असा एकूण 28 कोटी 78  लाख खर्च अपेक्षित आहे.

Pune : कर्वे रोडवरील वाहनांच्या पार्किंग व्यवस्थेत बदल

हा निधी खडकवासला पाटबंधारे विभागास देण्यात येणार आहे. पाटबंधारे विभागाने दोन्ही बंधार्‍यांचे काम सहा महिन्यांपूर्वी सुरू केले आहे. त्यासाठी लागणारी रक्कम पाटबंधारे विभागास टप्प्याटप्प्याने देण्यात येणार आहे.

आतापर्यंत गहुंजे बंधार्‍याचे काम 20 टक्के आणि शिवणे बंधार्‍याचे काम 35 टक्के इतके झाले आहे. पाटबंधारे विभागाने मागणी केल्यानुसार पाच कोटी 50 लाखांच्या रकमेचा धनादेश दिला जाणार आहे. कामाच्या गतीनुसार  पाटबंधारे विभागास रक्कम दिली जाणार आहे. दोन्ही बंधारे व पुलाच्या कामासाठी 28 कोटी 78 लाखांच्या खर्चास स्थायी समितीने मान्यता (Pimpri)  दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.