Pimpri : शहरी वाहतुकीत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल पिंपरी महापालिकेला प्रथम पारितोषिक

एमपीसी न्यूज – भारत सरकारच्या शहरी विकास मंत्रालयाने (Pimpri) अर्बन मोबिलिटी इंडिया कॉन्फरन्स 2023 साठी शहरी वाहतूक विभागांमध्ये नाविन्यपूर्ण विषयांवर काम करणाऱ्या महानगरपालिका, मेट्रो कार्पोरेशन, बस कार्पोरेशन यांच्याकडून प्रवेशिका मागविण्यात आल्या होत्या.

त्यामध्ये भारतातील अनेक शहरांमधून पिंपरी चिंचवड शहराची निवड होऊन प्रथम क्रमांकाचे पारितोषिक आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेस बहाल करण्यात आले. महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी हा पारितोषिक स्वीकारला.

Moshi : भावी पिढीला ग्लोबल वॉर्मिंगच्या संकटातून वाचण्यासाठी ‘ग्रीन सोसायटी’चाच पर्याय – अजित गव्हाणे

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने (Pimpri) विना वाहन वापर ( एन एम टी ) धोरणास आणि पिंपळे सौदागर परिसर, सांगवी- किवळे रस्ता व नाशिक – फाटा वाकड रस्ता यावरील सायकल मार्ग व पादचारी मार्ग इत्यादी पूरक सुविधांचा अहवाल केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाकडे सादर केला होता.

त्याआधारे हा पारितोषिक भारत सरकारच्या शहरी विकास मंत्रालयचे सचिव मनोज जोशी यांच्या हस्ते आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिल्ली येथील माणिक शॉ सेंटर येथे आयोजित केलेल्या 16 व्या शहरी वाहतूक विकास परिषदेत स्वीकारला. यावेळी समारंभाच्या वेळी महापालिकेच्या वतीने प्रकल्प विभागाचे सह शहर अभियंता प्रमोद ओंभासे, कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड, उप अभियंता सुनील पवार, आयटीडीपीचे प्रांजल कुलकर्णी तसेच डिझाईन शाळा चे संचालक आशिक जैन उपस्थित होते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.