Pimpri : आयटी कंपनीत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून लाखोंचा गंडा घालणाऱ्या चौघांना अटक

एमपीसी न्यूज- आयटी कंपनीमध्ये नोकरीचे आमिष दाखवून तरुणांची लाखो रुपयांची (Pimpri ) फसवणूक करणाऱ्या चार आरोपींना पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 4 यांनी अटक केली आहे.

महेश कुमार हरिश्चंद्र कोळी (वय 32 रा. सोमवार पेठ पुणे) अनोदीप चंद्रकांत पशुपती उर्फ शर्मा (वय 52 राहणार वाघोली ) श्रावण एकनाथ शिंदे (वय 32 राहणार वाघोली) एक महिला आरोपी अशी अटक आरोपींची नावे आहेत.

MNS : मनसेची ‘एक सही संतापा’ची मोहीम; सही करत नागरिकांचा संताप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांनी टेक्नॉलॉजी एस ए पी,एम एम व एम के मॅनेजमेंट सर्विस नावाने महेश कुमार हा एजंसी चालवत होता.त्यांनी विमान नगर व खराडी येथील आयटी कंपन्या मध्ये जॉब लावण्याचे आमिष दाखवून 60 ते 70 मला मुलींकडून 50 लाख रुपये घेत बनावट नेमणूक पत्र देत त्यांची आर्थिक फसवणूक केली होती.

यामध्ये अनुदिप शर्मा याने त्याची बनावट कंपनी बनवून त्या कंपनीचे नेमणूकपत्र दिले होते.आरोपींवर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून गुन्हे शाखा 4 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे हे तपास करत  आहेत.

हि कारवाई गुन्हेशाखा 4 चे  वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे,सहायक पोलिस निरीक्षक सिद्धनाथ बाबर,पोलीस उपनिरीक्षक गणेश रायकर,सहायक पोलिस उपनिरीक्षक नारायण जाधव,संजय गवारे,आदिनाथ मिसाळ,दादा पवार, पोलीस हवालदार प्रवीण दळे, रोहिदास आडे तुषार शेटे पोलीस नाईक वासुदेव मुंडे,

सुनील गुट्टे,सुरेश जायभाये, पोलीस शिपाई प्रशांत सय्यद धनाजी शिंदे गोविंद चव्हाण सुखदेव गावंडे तसेच तांत्रिक विश्लेषण विभाग पुणे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय तुंगार सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पानमंद पोलीस हवालदार नागेश माळी पोलीस शिपाई पोपट हुलगे (Pimpri ) यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.