Alandi : गोहत्या करणाऱ्या गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी – श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान

एमपीसी न्यूज : आषाढी एकादशीच्या दिवशी प्रति पंढरपूर म्हणून (Alandi) ओळखल्या जाणाऱ्या कडूस (ता. खेड) या गावी समाजकटकांनी गो हत्या केली. ज्या समाज कटकांनी गोहत्या केली त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्या कडे श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी मागणी केली आहे.

दि.29 रोजी आषाढी एकादशीच्या दिवशी खेड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कडूस ता. खेड येथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या मदतीने अवैध कत्तल खाण्यावर दुपारी 12 वाजता छापा टाकला.

तेथे गोहत्या केल्याचे आढळून आले. क तीर्थक्षेत्र दर्जा असणाऱ्या प्रति पंढरपूर कडूस येथे माघ शुद्ध दशमी ते माघ शुद्ध पौर्णिमा असे 6 दिवस साक्षात पांडुरंग येतात.

तुकाराम महाराजांच्या 14 टाळकऱ्यांपैकी 1 कडूस गावचे आहेत. अश्या पवित्र ठिकाणी गोहत्या करण्यात आली. या निषेधार्थ गावात  कडकडीत बंद पाळण्यात आला होता.

साबीर शौकात मुलाणी उर्फ इनामदार, शाकिर शौकत मुलाणी उर्फ इनामदार आणि इतर 4 जणांनी हिंदू धर्मातील पवित्र असणाऱ्या अनेक गोमातांची हेतुपूर्वक कत्तल केली असून हिंदू धर्मियांच्या  धार्मिक श्रद्धांचा दृष्ट उद्देशाने केलेले हनन असल्याचे स्पष्ट होत आहे.

सदर व्यक्तींची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून वारंवार धार्मिक तेढ निर्माण (Alandi) करण्यासाठी पोषक कृत्ये यांच्या मार्फत करण्यात येत आहे. आरोपींकडून कार्यकर्त्यांच्या जीवाला धोका आहे.

तरी संबंधित धार्मिक भावना दुखावल्या बद्दल भा.दं.वि. कलम 295 (अ) महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम (गोवंश हत्याबंदी )कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हे वारंवार करणाऱ्या साबीर शौकत मुलाणी उर्फ इनामदार, आणि शाकिर शौकत मुलाणी उर्फ इनामदार या गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी. अशी मागणी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदीकडून करण्यात आली आहे.

MNS : मनसेची ‘एक सही संतापा’ची मोहीम; सही करत नागरिकांचा संताप

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.