Alandi : प्राचार्य डॉ बी बी वाफारे यांना “लाइफटाइम अचिव्हमेन्ट अवॉर्ड”

एमपीसी न्यूज- आळंदी येथील (Alandi) माईर्स एम. आय. टी. कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . बी .बी वाफारे यांना गणित या विषयातील  संशोधनातील योगदान  बद्दल   इंटरनॅशनल कॉन्फरेन्स फॉर  सायन्स टेकनॉलॉजि अँड मानजमेंट इंडिया   या संस्थे कडून  “लाइफटाइम अचिव्हमेन्ट अवॉर्ड”  देऊन सन्मानित करण्यात आले. 

सदर पुरस्कार प्राचार्य डॉ. बाळासाहेब वाफारे यांना दिनांक 7 जुलै रोजी वितरीत करण्यात आला. या निमित्याने एमआयटी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षिकेत्तर कर्मचाऱ्यांकडूनही त्यांचा सत्कार करण्यात आला. वाफारे यांचे शैक्षणिक क्षेत्रातील कार्य उल्लेखनिय आहे. गेले 26 वर्षापसून ते या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत.

Alandi : गोहत्या करणाऱ्या गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी – श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान

त्यांचे प्राथमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण पारनेर तालुक्यातील कर्जुले हरया या गावात झाले. महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातल्या नामांकित फर्गुसन महाविद्यालयात झाले तर पदव्युत्तर शिक्षण व पीएच डी पुणे विद्यापीठातील गणित विभातून झालेली आहे.

त्यांना आतापर्यंत विविध शासकीय व अशासकीय संस्थाकडूंन 19 पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांचे संशोधन क्षेत्रातील काम खूप उल्लेखनिय आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विविध नियतकालिकांमध्ये 113 संशोधन पेपर प्रकाशित झालेले आहेत.

गेले 1999 पासून मायर्स एमआयटी या संस्थेच्या महाविद्यालयात विविध पदांवर कार्यरत आहेत. 2007 पासून एमआयटी कला, वाणिज्य, व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य पदावर कार्यरत आहेत.याबाबतची माहिती राहुल बाराथे यांनी (Alandi) दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.