Pimpri : अतिउच्चदाबाच्या वीजवाहिन्यांमध्ये बिघाड झाल्याने  पिंपरी-चिंचवड मधील वीजपुरवठा खंडित

एमपीसी न्यूज – पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या (पीजीसीआयएल) 400 केव्ही शिक्रापूर ते तळेगाव (Pimpri) अतिउच्चदाब वीजवाहिनी तुटल्याने शनिवारी (दि. 8 ) सकाळी 9 च्या सुमारास पिंपरी-चिंचवड  परिसरातील ग्राहकांचा वीजपुरवठा बंद पडला आहे.

पीजीसीआयएलच्या शिक्रापूर ते तळेगाव 400 केव्हीच्या अतिउच्चदाब चारपैकी एक वीजवाहिनी तळेगाव एमआयडीसीजवळ आज सकाळी 9 वाजता तुटली. त्यामुळे सुमारे 355 मेगावॅट विजेचे वहन ठप्प झाले.

Alandi : प्राचार्य डॉ बी बी वाफारे यांना “लाइफटाइम अचिव्हमेन्ट अवॉर्ड”

पिंपरी गाव, रहाटणी, पिंपळे सौदागर, काळेवाडी, चिंचवडगाव, वाल्हेकरवाडी, रावेत, देहू रोड, खराडी, जुना मुंढवा, थिटेवाडी, थेऊर, पेरणे, शिक्रापूर, कोरेगाव भिमा, सणसवाडी, कोरेगाव मूळ आदी परिसरातील वीजपुरवठा बंद पडला.

पॉवर ग्रीडच्या अतिउच्चदाब 400 केव्ही वीजवाहिनीच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे. मात्र त्यास सात ते आठ तास लागण्याची शक्यता आहे.

दरम्यान महापारेषण व महावितरणच्या संयुक्त प्रयत्नातून भारव्यवस्थापनाद्वारे पर्यायी स्वरुपात वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरु आहे. तर काही ठिकाणी नाईलाजाने चक्राकार पद्धतीने भारनियमन करावे लागणार (Pimpri) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.