Nigdi : जास्त परताव्याचे आमिष दाखवून सतरा लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – गुंतवलेल्या रकमेवर दहा टक्के अधिक परतावा देण्याच्या (Nigdi) आमिषाने 172 हजारांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार जून 2018 ते 20 जानेवारी 2022 या कालावधीत चिंचवड डोंबिवली येथे घडला.

राजेंद्र आनंदराव पाटील (वय 46, रा पिंपरी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राजेश उमाशंकर सिंग उर्फ राजेश कश्यप (वय 52), प्रदीप शशिकांत गांगुर्डे (वय 44, रा ठाणे ईस्ट) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimpri : अतिउच्चदाबाच्या वीजवाहिन्यांमध्ये बिघाड झाल्याने  पिंपरी-चिंचवड मधील वीजपुरवठा खंडित

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजेश याने फिर्यादी यांना 30 महिने कालावधीसाठी काही रक्कम गुंतवण्यास सांगितले. त्या गुंतवलेल्या रकमेवर दहा टक्के अधिक परतावा देण्याचे आमिष आरोपीने दाखवले. त्यानुसार फिर्यादी आणि अन्य काही लोकांनी आरोपीच्या कंपनीमध्ये गुंतवणूक केली.

मात्र तीस महिन्यानंतर आरोपीने कोणताही परतावा अथवा गुंतवलेली रक्कम परत न देता 17 लाख 72 हजार 473 रुपयांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत (Nigdi) म्हटले आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.