Talegaon Dabhade : ‘काव्या’, ‘इंद्रायणीच्या’ प्रयत्नांना एमपीएससी मध्ये उज्ज्वल यश..

एमपीसी न्यूज – नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या (MPSC) निकालात मावळ तालुक्याने (Talegaon Dabhade ) इतिहास रचला आहे. सोमाटणे फाटा येथील काव्या करिअर ॲकडमीचे तब्बल सहा विद्यार्थी पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी पात्र ठरले असल्याची माहिती काव्या करिअर अकॅडमीचे संचालक मार्गदर्शक शंकर हुरसाळे यांनी दिली.

Nigdi : जास्त परताव्याचे आमिष दाखवून सतरा लाखांची फसवणूक

काव्या करिअर अकॅडमीचे संचालक शंकर हुरसाळे म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या शारीरिक परीक्षेच्या तयारीसाठी इंद्रायणी महाविद्यालयाने भव्य क्रीडांगणाची उपलब्धता करून दिली. त्यामुळे चांगल्या दर्जाच्या सोयी सुविधा मिळाल्याने विद्यार्थ्यी उत्तम तयारीनिशी परीक्षेस सामोरे जाऊ शकले.

काव्या करिअरच्या या यशात इंद्रायणी  विद्या मंदिर संस्थेचा पर्यायाने उद्योजक रामदास काकडे यांचा मोठा सहभाग असल्याची भावना श्री हुरसाळे यांनी व्यक्त केली.

काव्या करिअर अकॅडमीचे मार्गदर्शक शंकर हुरसाळे यांच्या विशेष प्रयत्नाने आलेले यश विद्यार्थ्यांची मेहनत आणि इंद्रायणी विद्यालयाचे सहकार्य यातून हे यश साकार झाल्याची भावना इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे यांनी व्यक्त (Talegaon Dabhade ) केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.