Kishor Aware Murder : किशोर आवारे खून प्रकरणी मुख्य आरोपी भानू खळदे अखेर पोलिसांच्या ताब्यात

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांच्या खून (Kishor Aware Murder) प्रकरणातील मुख्य आरोपी माजी नगरसेवक चंद्रभान तथा भानू खळदे याला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या एका पथकाने आज (शनिवारी) पहाटे नाशिकजवळून ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे, मात्र या वृत्ताला पोलिसांनी अद्यापि अधिकृत दुजोरा दिलेला (Kishor Aware Murder ) नाही.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या आवारात किशोर आवारे यांच्यावर पिस्तूलने गोळ्या झाडून तसेच कोयत्याने वार करून निर्घृण खून (Kishor Aware Murder) करण्यात आला होता. या प्रकरणातील मुख्य संशयित असलेला माजी नगरसेवक भानू खळदे हा फरार होता. अखेर त्याला जेरबंद करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.

प्राथमिक तपासात भानू खळदे याचा मुलगा गौरव खळदे याचा खुनात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्याकडे चौकशी केली. यावेळी सदर गुन्ह्याच्या कटकारस्थानात भानू खळदे याचा सहभाग असल्याचे माहिती पुढे आली.

Talegaon Dabhade : ‘काव्या’, ‘इंद्रायणीच्या’ प्रयत्नांना एमपीएससी मध्ये उज्ज्वल यश..

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर आवारे आणि चंद्रभान खळदे यांनी एकत्रित येत तळेगाव दाभाडे येथे जनसेवा विकास समिती या स्थानिक राजकीय आघाडी स्थापन केली होती. त्या माध्यमातून खळदे यांच्या पत्नी हेमलता खळदे या नगरसेवक पदावरही निवडून आलेल्या होत्या, तर जनसेवा विकास समितीचे सहा नगरसेवक ही निवडून आले होते.

त्यानंतर खळदे आणि आवारे यांच्यात वैचारिक मतभेद होऊन दोघेही वेगळे झाले होते. डिसेंबर 2021 मध्ये खळदे याने आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुंबई येथे जाहीर प्रवेश केला होता.

खळदे हे काँग्रेसच्या माध्यमातून यापूर्वी नगरसेवक म्हणून निवडून आले होते. डिसेंबर 2022 मध्ये वृक्षतोडीच्या प्रकरणातील वादावरून किशोर आवारे यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयात चंद्रभान खळदे यांच्या कानाखाली लगावली होती. याचा राग मनात धरून खळदे याने आवरे यांच्या खुनाची (Kishor Aware Murder) सुपारी दिली, अशी माहिती तपासात पुढे आली.

किशोर आवारे खून (Kishor Aware Murder) प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत पाच हल्लेखोरांना अटक केलेली आहे. अभियांत्रिकी पदवीधर असलेल्या गौरव खळदे याच्या तपासात  त्याच्या वडिलांचाही या खून प्रकरणात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी भानू खळदे याचा शोध सुरू केला. मात्र ते मागील दीड महिन्यापासून तो फरार होता. अखेर खळदे याला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले (Kishor Aware Murder ) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.