Pune : डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी रुग्णालयात रोबोटिक तंत्रज्ञानाद्वारे यकृत प्रत्यारोपण

एमपीसी न्यूज –  यकृताच्या आजाराने ग्रस्त असलेल्या एका 35 वर्षीय शेतकऱ्यावर (Pune) रोबोटिक शस्त्रक्रियेद्वारे यकृत प्रत्यारोपण करण्यात आले आहे. रुग्णाला तातडीने यकृताची गरज होती. अशा परिस्थितीत  रुग्णांच्या पत्नीने यकृत दान करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे एकाच वेळी पत्नीचे यकृत काढून त्याचे यशस्वी प्रत्यारोपण पतीवर करण्यात आले आहे. प्रत्यारोपण डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये झाले असून पुण्यात पहिल्यांदा रोबोटिकद्वारे यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

अवयव प्राप्त होण्यासाठी प्रतिक्षा यादी मोठी असल्याने अनेक रुग्णांना जीव गमवावा लागतो. मात्र अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रुग्णांचा जीव वाचवता येतो हे या घटनेतून समोर आले आहे. डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी रुग्णालयात सर्व अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध असल्याने रुग्णांना लाभ होत आहे.

बहू-अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया विभागाच्या प्रमुख डॉ. वृषाली पाटील यांच्या  देखरेखीखाली उपचार करण्यात आले. रुग्णाला यकृत कोमाचा आजार होता आणि त्याचे यकृत वेगाने निकामी होत होते. यकृत प्रत्यारोपणासाठी रुग्णाचे नाव प्रतीक्षायादीत असले तरी, मृत व्यक्तीकडून यकृत लवकर मिळेलच याचा अंदाज नसतो. या प्रकरणाच्या गुंतागुंतीमुळे, डॉक्टरांनी जिवंत दात्याचे प्रत्यारोपण हा पर्याय निवडला.

Kishor Aware Murder : किशोर आवारे खून प्रकरणी मुख्य आरोपी भानू खळदे अखेर पोलिसांच्या ताब्यात

दात्याच्या उजव्या यकृतावर हिपॅटेक्टॉमी रोबोटिक शस्त्रक्रिया करण्यात आली आणि तिचे उजवे यकृत तिच्या पतीला प्रत्यारोपित करण्यात आले. रुग्ण आणि दात्यांची प्रकृती उत्तम असल्याने  एका आठवड्यात रुग्णालयातून सोडण्यात आले. व्यायाम आणि संतुलीत आहार यामुळे  रुग्ण आणि दात्याचे यकृत सामान्यपणे कार्य करीत आहे.

रोबोटिक लिव्हिंग डोनर हेपेटेक्टॉमी हे यकृत प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियांमधील एक मोठे यश आहे. या शस्त्रक्रियेमुळे वेदना आणि गुंतागुतं कमी होते. पारंपारिक शस्त्रक्रिया करताना रक्तस्त्राव आणि वेदना जास्त होतात. मात्र, रोबोटिक शस्त्रक्रिया करताना रक्तस्त्राव आणि जखमा कमी होतात. यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेतील ही एक विशेष प्रगती आहे. परंतु देशातील फार कमी रुग्णालयांमध्ये  ही शस्त्रक्रिया पद्धती उपलब्ध आहे.

डॉ. भाग्यश्री पी. पाटील, (प्र-कुलपती, डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, ) म्हणाल्या, “हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे.  डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये आरोग्य सेवेचा दर्जा उंचावून रुग्णसेवा अधिकाधिक दर्जेदार आणि सर्वोत्तम करण्यासाठी सेवा देणाऱ्या सर्व तज्ञ डॉक्टरांची मी आभारी आहे. आम्ही आरोग्यसेवेमध्ये सतत नवीन आणि आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे सुधार आणून रुग्णसेवा अधिकाधिक सुरक्षित करण्यासाठी सतत प्रयत्नशील आहोत.

डॉ. वृषाली पाटील, (कार्यक्रम संचालिका आणि विभाग प्रमुख, बहू-अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी रुग्णालय, पिंपरी)  म्हणाल्या, “पुण्यात पहिली रोबोटिक यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पाडणे हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहेरुग्णाची गंभीर स्थितीचा विचार करता अचूकपणे वेळेवर उपचार आवश्यक असतात. अवयव दात्याची सुरक्षित शस्त्रक्रिया आणि उपचार सुद्धा  तितकेच महत्वाची असून त्याची आम्ही विशेष काळजी घेतो आणि रोबोटिक शस्त्रक्रियेने आम्हाला हे लक्ष्य साध्य करण्यात मदत केली. कमीत कमी टाक्यांची आणि सूक्ष्म छेद असणारी शस्त्रक्रिया ही आरोग्य तंत्रज्ञानातील पुढील पायरी असून ही प्रत्यारोपण शस्त्रक्रिया त्याचे उत्तम उदाहरण आहे.”

यावर भाष्य करताना डॉ. मनीषा करमरकर, (मुख्य कार्यकारी अधिकारी, डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी रुग्णालय, पिंपरी) म्हणाल्या, “या शस्त्रक्रियेत सहभागी झालेल्या डॉक्टरांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करते.  रुग्ण-केंद्रित दृष्टीकोन हेच आमचे मुख्य ध्येय असून, आम्ही नेहमीच आमच्या रुग्णांना सर्वोत्तम आणि सर्वात प्रगत आरोग्य सेवा प्रदान करण्याचा प्रयत्न करत असते.

डॉ. यशराज पाटील, (विश्वस्त व खजिनदार, डॉ.डी.वाय. पाटील विद्यापीठ अभिमत विद्यापीठ, पिंपरी )म्हणाले, रोबोटिक यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाली याचे सर्व श्रेय आमच्या तज्ञ डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना आहे.  रुग्णालयात जागतिक दर्जाच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध असल्याने रुग्णांना त्याचा लाभ होत आहे. हे त्यांचे एक उत्तम उदाहरण आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शस्त्रक्रियेतील गुतांगुंत कमी होते. तसेच अचूक शस्त्रक्रिया करता येते. सर्व सामान्य रुग्णांना दर्जेदार वैद्यकीय सुविधा मिळावी यासाठी आम्ही नेहमीच कार्यरत (Pune) असतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.