Alandi : न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन (Alandi) केल्याप्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दहा मे रोजी खेड तालुक्यातील मरकळ येथे घडली.

 राजेश पन्नालाल नहार (वय 56, रा. बिबवेवाडी पुणे) यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार हौशीराम उर्फ पप्पू शिवाजी दिघे, भरत नवनाथ आल्हाट (दोघे रा. कोयाळी, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune : डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी रुग्णालयात रोबोटिक तंत्रज्ञानाद्वारे यकृत प्रत्यारोपण

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विभुजा स्टील प्राइवेट लिमिटेड कंपनीचे संचालक आणि इतरत्र व्यक्तींना हस्तक्षेप करण्यास मज्जाव करण्याचे आदेश पुणे जिल्हा न्यायालयाने दिले होते. या आदेशाचे आरोपींनी उल्लंघन करत फिर्यादी यांच्या जागेत जाऊन सुरक्षारक्षकाला दमदाटी करत कामगारांना हुसकावून लावले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आळंदी पोलीस तपास करीत (Alandi)  आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.