PCMC : पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेत (PCMC) विविध विभागात मोठ्या संख्येने कंत्राटी कामगार काम करीत आहे. संबंधित ठेकेदार त्यांना पगार स्लिप देत नसल्याने त्यांना विविध प्रकारची अल्प मुदतीची अथवा दीर्घ मुदतीची कर्ज काढणे व इतर कामे करणे शक्‍य होत नाही. त्यामुळे पालिकेच्या सर्व कंत्राटी कामगारांना पगार स्लिपा देण्याचे आदेश पालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी द्यावेत, अशी मागणी भाजपा कामगार सेलचे सरचिटणीस हनुमंत लांडगे यांनी केली आहे.

Alandi : न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा

याबाबत लांडगे यांनी आयुक्त सिंह यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी महापालिकेमधून दर महिन्याला 30 ते 35 अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्त होत आहे. त्यामुळे महापालिकेत विविध विभागात ठेकेदारामार्फत कंत्राटी कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे.

मात्र, संबंधित ठेकेदार त्यांना पगार स्लिप देत नसल्याने त्यांना विविध प्रकारची अल्प मुदतीची अथवा दीर्घ मुदतीची कर्ज काढणे व इतर कामे करणे शक्‍य होत नाही. त्यामुळे सर्व कंत्राटी कामगारांना पगार स्लिपा देण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी सरचिटणीस लांडगे यांनी केली (PCMC) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.