Pimpri : फोन परत मागितला म्हणून तरुणावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज-  बोलायला दिलेला फोन परत मागितला म्हणून (Pimpri ) पंचवीस वर्षे तरुणावर कोयत्याने जीव घेणे वार करण्यात आले आहेत ही घटना शुक्रवारी(दि.7) रात्री पिंपरी येथे घडली.

शुभम राम माने (वय 25 रा पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी चिराग गायकवाड (वय 20 रा पिंपरी) व शुभम साबळे (वय 20 राहणार पिंपरी ) यांना अटक केली आहे.

PCMC : पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची मागणी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ,फिर्यादी यांच्याकडे आरोपींनी बोलण्यासाठी मोबाईल मागितला, यावेळी फिर्यादी यांनी दिलेला फोन परत मागितला असता याचा राग येऊन आरोपींनी फिर्यादीच्या डोक्यावर व हातावर कोयत्याने जीवघेणे वार केले, यावरून पिंपरी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून (Pimpri ) पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.